आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योग्य निर्णय:चारधाम यात्रेसाठी 7 लाख पर्यटकांनी केली होती बुकिंग, आता करताहेत रद्द

डेहराडून8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुंभमेळ्यातील संसर्गातून धडा घेत सरकारने रद्द केली चारधाम यात्रा

उत्तराखंड सरकारने हरिद्वार कुंभमेळ्यापासून धडा घेत कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता बघून मेमध्ये सुरू होणारी चारधाम यात्रा रद्द केली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री तीरथसिंह राव यांनी निर्णय घेतला की, चारधामांचे द्वार ठरलेल्या वेळी उघडतील मात्र यात्रा होणार नाही. या निर्णयामुळे पर्यटन उद्योग निराश झाला आहे. फेब्रुवारी- मार्चमध्येच यात्रा मार्गावरील गढवाल मंडळ विकास परिषदेच्या शेकडो गेस्ट हाऊसना १० कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग मिळाली होती. मात्र, संसर्गामुळे सात लाख पर्यटकांनी बुकिंग रद्द केली आहे. संसर्ग वाढल्याने पर्यटकांचे फोन येणे सुरू झाले आहे.

यात्रा मार्गावर व्यापाऱ्यांनी तयारी सुरू केली होती, तेही निराश आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे नुकसान सहन करणाऱ्या पर्यटन विभाग व होम स्टे व्यावसायिकांना या निर्णयाचा फटका बसला आहे. मात्र, संसर्ग पसरण्याची त्यांनाही भीती आहे.

गेस्ट हाऊस झाले केअर सेंटर
पर्यटक निवासगृहांना कोविड केअर सेंटर करण्यात आले आहे. नैनितालमध्ये सुखाताल व तल्लीताल शासकीय रेस्ट हाऊसमध्ये कोविड केअर सेंटर बनवण्यात येत आहे. ऋषिकेशमध्ये भरतभूमी, मुनीकिरेती येथे सेंटर करण्यात आले आहे. राज्यात रोज पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.

आशा : पर्यटक बुकिंग पुढे वाढवतील
कोरोनामुळे उत्तराखंडाचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जीएमव्हीएनचे एमडी आशिष चौहान सांगतात की, सध्या तीन कोटींपैकी फक्त सात लाखांची बुकिंग रद्द झाली आहे. पर्यटक बुकिंग रद्द करण्याऐवजी बुकिंग पुढे वाढवतील व स्थिती सुधारल्यावर परत येतील, अशी आशा आहे.

हॉटेल व होम स्टे व्यावसायिक निराश, मदत निधीची मागणी
- यमुनोत्री मार्गावर जितेंद्र रावत यांचे रेस्तराँ व होम स्टे आहे. ते सांगतात, मी पुण्यात हॉटेल शेफ होतो. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने परत येऊन व्यवसाय सुरू केला होता. बँकेतून कर्ज घेतले आणि काही बचतीचा पैसा लावला. मात्र सरकारच्या निर्णयामुळे आता कुटुंबात तणाव आहे.
- उत्तराखंड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप सहानी सांगतात, गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर जवळपास पाच महिने हॉटेल पूर्णपणे बंद होती, यामुळे खूप नुकसान झाले. यंदा खूप आशा होती.
- रुद्रप्रयागमध्ये होम स्टे चालवणारे जगदीश सेमवाल सांगतात, यात्रेमुळे स्थिती बदलेल असा विचार करून त्यांनी दुरुस्ती केली होती. मात्र, आता बँकेच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे हे समजत नाही.
- एसडीसी थिंक टँकचे संस्थापक अनुप नौटियाल सांगतात, आता सरकारने पर्यटन व्यवसायाशी संबंधित लोकांना त्वरित मदत निधी जाहीर करायला हवा. तरुणांनी बँकेतून कर्ज घेतले आहे. त्यांची स्थिती सरकारने लक्षात घ्यायला हवी.

बातम्या आणखी आहेत...