आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 7 Major Parties Including National Conference, PDP And Congress Announce People's Alliance In J And K

कलम 370 परत आणण्यासाठी काश्मीरमध्ये नवी आघाडी:नॅशनल कॉन्फ्रेंस, पीडीपी आणि काँग्रेससह 7 प्रमुख पक्षांची पीपुल्स अलायंसची घोषणा, फारूक अब्दुल्ला म्हणाले- आम्हाला आमचा हक्क परत हवाय

श्रीनगर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुपकार डिक्लेरेशनवर स्वाक्षरी करणाऱ्या राजकीय पक्षांनी काश्मीरमध्ये नव्या आघाडीची स्थापनी केली आहे. नॅशनल कॉन्फ्रेंसचे चीफ फारूक अब्दुल्ला यांनी गुरुवारी आपल्या गुपकार रोडवरील निवासस्थानी याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, या आघाडीचा उद्देश जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 च्या पूर्वीची परिस्थिती आणने, म्हणजे कलम 370 रद्द करण्याचा आहे.

मागच्या वर्षी पीडीपी, नॅशनल कॉन्फ्रेंस, काँग्रेस, माकपा, जम्मू-काश्मीर पीपुल्स कॉन्फ्रेंस, पँथर्स पार्टी आणि जम्मू-काश्मीर अवामी नॅशनल कॉन्फ्रेंस सह अनेक पक्षांनी गुपकार डिक्लेरेशनवर स्वाक्षरी केली होती. हे डिक्लेरेशन राज्याला विशेष दर्जा परत मिळवून देण्यासाठी आणि राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यासाठी करण्यात आला होता.

नवी आघाडी एकत्र निवडणूक लढवू शकते

फारूक पुढे म्हणाले की, "आम्ही या आघाडीचे नाव पीपुल्स अलायंस ठेवले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही आघाडी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी लढाई लढेल. राज्यातील जनतेला 5 ऑगस्ट 2019 पूर्वी असलेले अधिकार मिळाले, ही आमची केंद्राकडे मागणी आहे. असे म्हटले जात आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीची घोषणा झाल्यावर हे सर्व पक्ष एकत्र निवडणूक लढवू शकतात.

नोव्हेंबर 2018 मध्ये आघाडी झाली होती

यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये पीडीपीच्या नेतृत्वात आघाडीची स्थापना झाली होती. यात नॅशनल कॉन्फ्रेंस आणि काँग्रेसदेखील सामील होते. तीन वर्षे सरकार चालवल्यानंतर पीडीपी आणि भाजपमध्ये असलेली यूती जून 2018 मध्ये तुटली होती. 5 महीन्यानंतर तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभा भंग केली. पण, राज्यपालांच्या या निर्णयाच्या अर्ध्या तासापूर्वी पीडीपी चीफ महबूबा मुफ्तींनी राज्यपालांना पत्र पाठवून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रेंससोबत सत्ता स्थापन करण्याचे म्हटले होते. त्यांचे म्हणने होते की, पीडीपीकडे 56 आमदार आहेत, पण राज्यभवनाने सांगितले की, त्यांना महबुबा यांचा फॅक्स मिळाला नाही.

बातम्या आणखी आहेत...