आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर सीबीआयची कारवाई:जम्मू-काश्मीर एसआय भरती प्रकरणात ७ जणांना अटक

श्रीनगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीर पोलिस सब इन्स्पेक्टर भरती प्रकरणात सीबीआयने अन्य सात जणांना अटक केली आहे. ज्यात चार केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) चे जवान आहेत. याशिवाय अखनूरमध्ये राहणाऱ्या दोन आणि हरियाणाच्या रेवाडीच्या एकास अटक करण्यात आली आहे. पेपर फुटीप्रकरणी या सर्वांना दोषी धरण्यात आले आहे. त्यांना अटक करण्यापूर्वी सीबीआयने या लोकांच्या घरावर छापे टाकले होते. सीबीआयने मंगळवारी जम्मू, पठाणकोट, रेवाडी आणि कर्नाल येथे छापे टाकले होते. कारवाईदरम्यान चौघांना अटक करण्यात आली. अशाप्रकारे आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. छाप्यात त्यांच्याकडे महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांमध्ये १२०० उपनिरीक्षकांच्या पदांसाठी भरतीची लेखी परीक्षा २७ मार्च रोजी जाहीर झाली होती. निकाल ४ जून रोजी जाहीर झाला होता.

बातम्या आणखी आहेत...