आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 7 Rebel Leaders Suspended From BJP; Suddenly The Prime Minister Reached 'Kamalam'

गुजरात निवडणूक:भाजपमधून 7 बंडखोर नेते निलंबित; अचानक ‘कमलम’ मध्ये पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी

गांधीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाने रविवारी ७ बंडखोर नेत्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले. हे नेते तिकीट न मिळाल्याने नाराज होते आणि त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमध्ये ८ सभा घेत होते, त्याच दिवशी पक्षाने निलंबनाची कारवाई केली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी अचानक प्रदेश भाजप मुख्यालय ‘कमलम’ला भेट दिली. राजकोटहून अहमदाबादला पोहोचल्यानंतर ते राजभवनात जाणार होते, पण तो स्थगित करून त्यांनी निवडणूकविषयक बैठक घेतली. निलंबित करण्यात आलेले नेते दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र भागातील आहेत. सूत्रांच्या मते, निलंबनाची कारवाई सोमवारीही होऊ शकत होती, कारण सोमवारी दुसऱ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

अर्ज मागे न घेणाऱ्या नेत्यांना शिस्तभंगामुळे निलंबित केले जाऊ शकते. त्यात वडोदराचे बाहुबली नेते मधू श्रीवास्तव यांच्या नावाचाही समावेश आहे. गुजरातमध्ये सलग सातव्या वेळेस सत्ता मिळवण्याची इच्छा बाळगून असलेल्या भाजपने विद्यमान ४२ आमदारांना तिकीट दिले नाही. भाजपने ज्या नेत्यांना निलंबित केले त्यात नांदोट मतदारसंघातील हर्षद वसावा, केशोदमधील अरविंद लाडाणी, ध्रांगद्रातील छत्रसिंह गुंजारिया, पारडीतील केतन पटेल, राजकोट ग्रामीणचे भरत चावडा, वेरावळचे उदय शहा आणि राजुलाचे करण बारैया यांचा समावेश आहे.

भाजपने १६० उमेदवारांच्या पहिल्या यादीत विद्यमाना ३८ आमदारांना तिकीट दिले नव्हते. त्यात माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश होता. गुजरातमध्ये २७ वर्षांपासून सत्तारूढ असलेल्या भाजपला २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत १८२ पैकी ९९ जागा मिळाल्या होत्या.

प्रो इन्कम्बन्सी : विकासाचे रूपांतर मतदानात करा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यामुळे २७ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला अँटी इन्कम्बन्सीसारख्या चिंताही आहेत. बैठकीत पंतप्रधानांनी आपली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून ती प्रो इन्कम्बन्सीत बदलण्याचा मंत्र दिला. मोदी म्हणाले की, आपण जी कामे केली ती जनतेपर्यंत पोहोचवा.

नवी भूमिका : ‘नरेंद्रचे सर्व विक्रम भूपेंद्रभाईंनी मोडावेत’ यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची घरोघरी व ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्याची नवी शैली पाहायला मिळत आहे. जाहीर सभा संपल्यानंतर मोदी लोकांना विनंती करत,‘माझे एक काम कराल का?’ असा प्रश्न विचारतात. लोकांनी हो म्हणताच सभास्थळाचे नाव घेत विनंती करतात की घरी जाऊन ज्येष्ठांना सांगा की नरेंद्रभाई आले होते, तुमची आठवण काढत होते. नमस्कार सांगितला आहे. शनिवारी वलसाडच्या सभेनंतर हा मंत्र मोदींनी रविवारी धोराजीतही अवलंबला. ‘विजयी मताधिक्य एवढे असावे की नरेंद्रचे सर्व रेकॉर्ड भूपेंद्रभाईंनी मोडावेत,’ अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.

बातम्या आणखी आहेत...