आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 7% Women Are Drivers In The Country, They Account For Only 3% Of Fatal Accidents

महिला स्टिअरिंग हाताळण्यात उत्तम:देशातील एकूण चालकांमध्ये त्यांचा वाटा 7%, त्या केवळ 3% जीवघेण्या अपघातांना बळी पडतात

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

तुम्हीदेखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना वाटते की महिला चांगल्या चालक नाहीत, तर ही बातमी नक्की वाचा. अपघातात बळी पडणाऱ्या वाहनचालकांमध्ये ३% महिला आहेत. रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२० मध्ये अपघातात ५६,३३४ (९७.३%) पुरुष आणि १५५१(२.७%) महिला चालकांचा मृत्यू झाला. तर, एकूण २०.५८ कोटी चालकांपैकी १.३९ कोटी महिला (६.७६%) आहेत. प्राण गमावलेल्या पादचाऱ्यांमध्ये १९,१८८ (८१.६%) पुरुष व ४२९९(१८.४%) महिला होत्या. दिल्ली सरकारच्या ताज्या अहवालानुसार, २०२१ मध्ये दिल्लीत रस्ते अपघातांमुळे एकूण १२३९ लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी केवळ १% अपघातांसाठी महिला चालक जबाबदार आहेत.

५ वर्षांतील शोध; महिला चालकांचे प्रमाण ५०% पेक्षा जास्त, तरी अपघातांत वाटा कमी
जर तुम्ही विचार करत असाल की भारतात महिला चालकांची संख्या कमी असेल तर अपघातही कमी होतील, तर ऑस्ट्रेलियातील संशोधन वाचा...
-ऑस्ट्रेलियातील ५२% चालक महिला आहेत. २०१५ ते २०१९ दरम्यान ६५७८१ चालक गंभीर झाले किंवा त्यांचा मृत्यू झाला. यापैकी ५४.५ पुरुष आणि ४५.५% महिला होत्या.
- १९९६ ते २०१९ दरम्यान केलेल्या अभ्यासानुसार, रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांपैकी केवळ २६ % महिला होत्या.

सुरक्षेची जास्त खात्री; महिलांच्या तुलनेत पुरुषांना प्रति किमी ड्रायव्हिंगचा धोका दुप्पट
ब्रिटनमधील २००५-२०१५ दरम्यानच्या प्रवासी सर्वेक्षणानुसार...

-कार आणि व्हॅनच्या ड्रायव्हिंगमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुष प्रति किमी दुप्पट आणि दुचाकीस्वार १० पट जास्त धोकादायक असतात.
-अभ्यासानुसार, पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया वेगमर्यादेचे उल्लंघन करण्याची शक्यता १२% कमी आहे.जास्त वेळ लक्ष केंद्रित करतात.
-ब्रिटनमध्ये ८४% पुरुष चालक मद्यपान करून गाडी चालवतात तर ७८% मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवताना पकडले जातात.

जेंडर सेटिंगची तयारी, कारण महिला अधिक चांगल्या चालक आहेत
लंडन | न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, ड्रायव्हरलेस कारमध्येही लिंग आणि वयानुसार सॉफ्टवेअर बदलणे आवश्यक आहे. नवीन संशोधनाचे निष्कर्ष दर्शवतात की महिला चालकांचा प्रतिसाद वेळ पुरुषांपेक्षा चांगला आहे. संशोधक डॉ. शू ली यांच्या मते, आम्ही खात्रीने सांगू शकतो की महिला पुरुषांपेक्षा चांगली गाडी चालवू शकतात.

बातम्या आणखी आहेत...