आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरीच्या विद्यार्थीनीवर शौचालयात RAPE:मॅडम हाती बिस्किट देत म्हणाल्या -घरी जा; तक्रार करणाऱ्या कुटुंबीयांनाही झाली मारहाण

पाटणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील एक सरकारी शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका मुलीवर स्वच्छता कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुलगी शौचालयात एकटी पाहून आरोपीने हे कृत्य केले. शाळेतील अन्य विद्यार्थीनी तिथे आल्यानंतर आरोपी पीडित मुलीला तिथेच सोडून पसार झाला.

दुसरीकडे, शाळेच्या 2 शिक्षिकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुलीला बिस्किट देऊन घरी पाठवले. तसेच आई-वडिलांना याविषयी काहीही न सांगण्याची तंबी दिली. त्यानंतर मुलीचे वडील व चुलत भाऊ तक्रार घेऊन शाळेत पोहोचले असता त्यांना मारहाण करण्यात आली. ही घटना 27 ऑगस्टची आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणी निदर्शने व रास्ता रोको केल्यानंतर ती 5 दिवसांनी उजेडात आली.

प्रकरण झीरोमाइल ओपी क्षेत्रातील एका शाळेचे आहे. गावताील स्थानिक लोकप्रतिनिधी व शाळेच्या व्यवस्थापनाने 5 दिवसांपर्यंत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामस्थांनी 1 सप्टेबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर 4 तास रास्ता रोको केला.

पीडित कुटुंबीयाने एफआयआर दाखल करून आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देऊन रास्तो रोको थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर येथील वाहतूक सुरूळीत झाली.

शौचालयात एकटी पाहून केला बलात्कार

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी माध्यान्ह भोजनावेळी 7 वर्षीय पीडिता शौचालयाला गेली होती. तेव्हा शाळेच्या स्वच्छता कर्मचाऱ्याने तिला तिथे एकटे पाहून बलात्कार केला. शाळेच्या अन्य विद्यार्थीनी शौचालयाकडे आल्या असत्या त्यांना दरावाजा आतून बंद असल्याचे आढळले. त्यांनी जोराने दरवाजा ठोठावल्यानंतर आरोपीने पीडितेला सोडले व तेथून पळून गेला. त्यानंतर मुलीने आपल्या मैत्रिणीला पाहून हंबरडा फोडला.

शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात स्थानिकानी निदर्शने केली.
शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात स्थानिकानी निदर्शने केली.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शाळेच्या 2 शिक्षिकांनी पीडितेला बिस्किट देऊन शांत केले. तसेच झाल्या प्रकाराची आई-वडिलांना माहिती न देण्याचीही धमकी दिली. त्यामुळे घाबरलेली मुलगी आपल्या बहिणीसह घरी गेली. रस्त्यात तिची प्रकृती बिघडल्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिची बहिण कशीतरी तिला घेऊन घरी पोहोचली.

मुख्याध्यापकांची स्वच्छता कर्मचाऱ्याला मारहाण

पीडितेची अवस्था एवढी वाईट झाली होती की तिला आपल्या पालकांना झाल्या घटनेची कोणतीही माहिती देता आली नाही. त्यानंतर मुलीने आपल्या काकूला या घटनेची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी शाळा बंद होती. सोमवारी शाळा उघडल्यानंतर पीडितेचे नातेवाईक शाळेत पोहोचले. तिथे मुख्याध्यापकांनी कठोर भूमिका घेण्याऐवजी आरोपीला शाळेत बोलावून त्याला मारहाण केली. तसेच प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला.

शिक्षिकेच्या पतीची पीडितेचे वडील व चुलत भावाला मारहाण

गुरूवारी शाळेत गेलेल्या पीडितेचे वडील व चुलत भावाला तेथील एका शिक्षिकेच्या पतीने मारहाण केली. यामुळे नाराज झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. जवळपास 4 तासांनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.

आरोपी स्वच्छता कर्मचारी व मुख्याध्यापकाला अटक

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रामस्थांच्या निदर्शनानंतर पोलिसांनी आरोपी कर्मचारी व शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. आरोपी आपल्या सासुरवाडीत राहत होता. तो खगडिया जिल्ह्याचा आहे. तो आपल्या सासुरवाडीत राहून नोकरी करत होता.

FIR नोंदवून कारवाई सुरू

मुख्यालय डीएसपी निश्चित प्रिया यांनी सांगितले की, पोलिसांना गुरुवारपर्यंत या घटनेची कोणतीही माहिती नव्हती. आता एफआयआर दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...