आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 7 Years Girl Was Gang Raped Before Murder, Lungs Taken Out For Black Magic In Kanpur Uttar Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपत्य प्राप्तीसाठी अघोरी कृत्य:कानपूरमध्ये 7 वर्षांच्या चिमुरडीची बलात्कारानंतर केली हत्या, काळ्या जादूसाठी निपुत्रिक दाम्पत्याने खाल्ली चिमुकलीचे फुफ्फुसं

कानपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उजवीकडून) अंकुल आणि बिरान यांना अटक करून तुरूंगात पाठविले आहे. - Divya Marathi
(उजवीकडून) अंकुल आणि बिरान यांना अटक करून तुरूंगात पाठविले आहे.
  • दिवाळीच्या रात्री झाली होती मुलीचा हत्या, उत्तर प्रदेशच्या भदरस गावातील घटना

एकीकडे देशभरात दिवाळीचा उत्साह असताना उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर भागात मात्र एक घृणास्पद घटना घडली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी काळी जादू आणि तंत्र मंत्रासाठी एका 6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. दाम्पत्याला कोणतेही मुल नव्हते यामुळे त्यांनी पुतण्याकडून चिमुकलीची हत्या करवून घेतली.

आरोपी पुतण्याने मित्राच्या मदतीने आधी मुलीवर बलात्कार केला आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर तिचे काळीज काढून काका-काकूला दिले. काका-काकूने काळजाचा काही भाग स्वतः खाल्ला आणि उर्वरित भाग कुत्र्यांना खायला दिला. जोडप्याने या घृणास्पद कारमासाठी पुतण्याला 500 रुपये आणि त्याच्या मित्राला 1000 रुपये दिले होते.

शेजारच्या दुकानात सामान घेण्यासाठी गेली चिमुरडी, नंतर परत आली नाही

एसपी ग्रामीण बृजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, भदरस गावातील एका व्यक्तीची 7 वर्षीय मुलगी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी शेजारील दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. परंतु परतलीच नाही. कुटुंबियांनी रात्रभर तिचा शोध घेतला, पोलिसांनी देखील याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी काली मंदिराजवळ काही लोकांना मुलीचा मृतदेह विकृत अवस्थेत आढळला. शरीरावर कपडे नव्हते. जवळच रक्ताने माखलेली तिची चप्पल पडलेली होती.

दिवाळीच्या रात्री मुलीचा हत्या झाल्यामुळे तंत्र-मंत्रासाठी असे केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. अघोरी साधना करणारे या दिवशी विधी करतात आणि दुसरे असे की काली मंदिरासमोर मृतदेह सापडला होता. शरीरातील अनेक अंतर्गत भागही काढले होते.

काळ्या जादूने संतती प्राप्त होईल असे पुस्तकात वाचले होते

अतिरिक्त पोलिस अधीक्षक ब्रिजेश श्रीवास्तव यांनी सोमवारी सांगितले की, या प्रकरणात अंकुल कुरील (20) आणि बीरन (31) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी पीडित मुलीची दोन्ही फुफ्फुसं काढून मुख्य आरोपी परशुरामला दिली. परशुरामला काळ्या जादूसाठी या अवयवांची आवश्यकता होती, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

अंकुलने सांगितले की, काका-काकूला कोणतीही संतती नव्हती. एखाद्या मुलीचे फुफ्फुसं आपल्या पत्नीसोबत खाल्ले तर संतती प्राप्त होते, असे एका पुस्तकात वाचल्याचे काका परशुरामने मला सांगितले.

दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री योगी यांचे निर्देश

तंत्र-मंत्रासाठी मुलीच्या हत्येच्या संदर्भात डीआयजी म्हणाले की, याची पुष्टी करण्यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत. यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलीच्या हत्येच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टात या खटल्याची सुनावणी घेऊन राज्य सरकार लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा देईल, असे मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...