आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय तंत्रज्ञान उ्योगाने वित्त वर्ष २०२२ मध्ये ३ लाख ८० हजार फ्रेशर्सची भरती केली. ७०% पेक्षा जास्त युवा आगामी काळात टेक उद्योगात काम करू इच्छितात. दुसरीकडे, ८५% फ्रेशर्स पहिल्या नोकरीत २ वर्षेच राहू इच्छितात.
नॅस्कॉमच्या रिशेपिंग द फ्यूचर ऑफ वर्कफोर्स रिपोर्टनुसार, पाहणीत दिसले की, गेल्या काही वर्षांत फ्रेशर्सच्या वाढत्या संख्येमुळे तंत्रज्ञान उद्योगात १८-२०% लोक युवा आहेत. दुसरीकडे, ६९-७०% लाेक ३५ ते ४० वर्षांचे आहेत. ७९% पेक्षा जास्त १९ ते ३० वर्षांचे युवा योग्य वेतन आणि सुविधा मिळाल्यास सुरुवातीचे २ वर्षेच पहिल्या नोकरीला देऊ इच्छितात. अहवालानुसार, २०२१ पर्यंत तरुणाईची ही संख्या भारताच्या लोकसंख्येच्या ५२% झाली होती. ही जगातील लोकसंख्येत सुमारे ४७% आहे. २०३० पर्यंत जगात ४६% तर भारतात ५०% युवा लोकसंख्या राहील. हा आकडा अशा वेळी आला आहे, जेव्हा अव्वल आयटी संस्थांना दिसून आले की, नव्या भरतीमध्ये नोकरी सोडणे आणि कपात त्यांच्या संस्थेची कार्यक्षमता कमी करत आहे.
टॅलेंट हब बनवून भारताच्या भविष्याला आकार नाासकॉमच्या उपाध्यक्ष संगीता गुप्ता म्हणाल्या, नवा विचारांसोबत युवा कर्मचारी संबंध, नवीन ग्राहक/ क्लायंट आणणे आणि जुने कायम ठेवण्याशी संबंधित रणनीती निश्चित करत आहेत. भारत टॅलेंट हबच्या रूपात भविष्यास आकार देत आहे.
कंपनी निवडण्याच्या प्रकरणात ब्रँड व्हॅल्यू कमी केला जात आहे. यामुळे करिअर वृद्धी आणि नोकरीतील समाधान नव नोकरदारांसाठी जॉब निवडताना आवश्यक ठरते.युवा नोकरीतील स्थैर्य आणि लवचिकता आवश्यक मानतात,हे सर्व्हेत दिसले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.