आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:जगातील 70% लस मेड इन इंडिया, कोरोना काळात देशातील आरोग्य संस्था अधिक स्वावलंबी झाल्या : अदार पूनावाला

नवी दिल्ली | प्रमोद कुमार7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ म्हणाले, बुद्धिमत्ता व टेक्नॉलॉजीतून आम्ही पुढे जाऊ

कोविड-१९ वर १०० हून अधिक कंपन्या लस बनवत आहेत. अशा परिस्थितीत कोणता देश किंवा कंपनी सर्वप्रथम लस तयार करेल हे सांगणे कठीण आहे. आम्हाला आशा आहे की, ही लस तयार झाली तर ती लपवली जाणार नाही, असे भारतात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लस तयार करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले. त्यांच्याशी केलेली बातचीत अशी-

कोविडमध्ये आपण कोणत्या संधी शोधता?

एक इंग्रजी म्हण आहे- एव्हरी क्लाऊड हॅज अ सिल्व्हर लायनिंग (प्रत्येक दुःख किंवा अडचणीच्या घटनेत एक संधी लपलेली असते). कोविड जेव्हा भारतात आला तेव्हा ताबडतोब निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये भारत आघाडीवर होता. या परिस्थितीकडे आपण एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. ज्याद्वारे आपण आपली आरोग्यसेवा मजबूत करू शकतो. आपल्या आरोग्यसेवा धोरणांमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. यामुळे देशातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देता येईल.

भारतीय फार्मा बाजारावर कोविडचा काही सकारात्मक परिणाम होईल का?

जगातील एकूण लसींपैकी ९०% भारतीय आहेत. भारतीय कंपन्या जगातील उत्पादन क्षेत्रात आधीपासूनच आघाडीवर आहेत. महामारीच्या या काळात व्यावसाय आणि आरोग्य संस्था दोन्ही एकत्र आले आहेत, जेणेकरून भारत कोरोनाविरुद्ध आत्मनिर्भरतेने लढा देऊ शकेल. भारताची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सीरम मायलॅबसोबत दररोज २ लाख किट तयार करत आहे. मला खात्री आहे की आम्ही उपलब्ध प्रतिभा, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण विकासासाठी मदत करू, जेणेकरून इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

कोविड -१९ लसची चाचणी १००% यशस्वी होईल, त्याचा आधार काय आहे?

लस तयार करणे रोलर कोस्टर चालवण्यासारखे आहे. लस बनवताना चढउतार होतात. आपण संयम बाळगला पाहिजे. लगेच एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचू नये. चाचण्यांचे तीन टप्पे आहेत. आम्हाला तिन्ही टप्पे पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

जर चाचणी यशस्वी झाली नाही तर सीरमचे किती नुकसान होईल आणि आपण ते कसे सहन कराल?

आमची कंपनी नोंदणीकृत नसल्याने कोणत्याही गुंतवणूकदारास नफा किंवा परतावा देण्यास बांधील नाही. म्हणूनच चाचणीपूर्वी स्वतःच्या जोखमीवर लसीचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांसाठी इतर लसींचे उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे. चाचण्यांचे निकाल पाहून आम्ही आमच्या उत्पादनाचे प्रमाण कमी केले आहे. यापूर्वी आम्ही १ कोटी डोसची योजना आखली होती, ती आता काही लाखांवर मर्यादित आहे.

जगात याआधी कोणी असा धोका पत्करला आहे का? नसल्यास, याबद्दल काय विचार करीत आहात?

सध्या संपूर्ण जग एक अनपेक्षित महामारीशी लढा देत आहे. यामुळे आपले जीवन एक अनिश्चित काळासाठी ठप्प झाले आहे. प्रत्येक देश आपापल्या स्तरावर काम करत आहे. साथरोगाचा सामना करण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते करणे आवश्यक आहे.

कोरोनावर औषध आधी येईल की लस? सीरम औषधावरही संशोधन करत आहे?

आम्ही यूएस बायोटेक फर्म कोडानेक्स, ऑस्ट्रियाची थेमिस यासारख्या अनेक कंपन्यांसोबत भागिदारीच्या माध्यमातून लस तयार करत आहोत. याशिवाय दोन कंपन्या आहेत. सर्व कंपन्या ही लस विकसित करणे आणि बाजारात आणण्यासाठी मदत करत आहेत.

स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताची चर्चा आहे. फार्मा कंपनीला स्वदेशी करणे शक्य होईल काय? जसे अमेरिकेच्या कोडाजेनिक्स आणि पॅरिसच्या सनोफीसह सीरम काम करीत आहे?

आम्ही सामायिक मॉडेलवर संशोधन, विकास आणि नाविन्य यावर काम केले पाहिजे. जेणेकरुन ही लस मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकेल आणि जागतिक स्तरावर ती उपलब्ध होईल.

भारतात लस तयार झाल्यास किंमत किती असेल? जर परदेशी कंपन्यांनी प्रथम लस बनवली तर आपल्या देशात त्याची किंमत किती असेल?

किंमतीविषयी आताच काही सांगता येणार नाही. आम्हाला खात्री आहे की त्याची किंमत कमीच असेल. आम्हाला आशा आहे की सरकार ती खरेदी करेल आणि लोकांना मोफत उपलब्ध करुन देईल.

लस बनवताना आपल्या टीमसमोर सर्वात मोठे आव्हान कोणते होते?

टाइमलाइन. लॉकडाऊनमुळे अनेक देशांमध्ये समस्या आहेत. तथापि, आमचे तंत्रज्ञान आधुनिक आहे. याव्दारे लसीची मागणी पूर्ण करता येईल.

चाचणी यशस्वी झाल्यास तुमची लस कोणत्या बाजारात येईल? सरकारी पुरवठा की खासगी बाजारात?

सरकारच्या मागणीनुसार आणि चाचणीच्या यशावर आधारित ही लस भारताला उपलब्ध होईल. आम्हाला आशा आहे की, याचे सर्वाधिक डोस भारताला मिळतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser