आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर निराशा:24 तासांत 700 किमी प्रवास; पण 10 मिनिटांच्या विलंबामुळे वर्ष गेले वाया

दरभंगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोलकात्यास नीटची परीक्षा देण्यास गेला होता बिहारचा विद्यार्थी

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील १९ वर्षीय संतोषकुमार यादवने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण वर्षभर तयारी केली. परंतु दहा मिनिटे तो परीक्षा केंद्रावर उशिरा गेल्याने त्याचे एक वर्ष वाया गेलेे. संतोषचे परीक्षा केंद्र पूर्व कोलकात्यातील साल्ट लेक टाऊनशिप येथील एका शाळेत होेते. त्याने २४ तासांत सुमारे ७०० किमी प्रवास केला होता. या प्रवासात त्याने ३ बस बदलल्या. परंतु परीक्षा केंद्रावर जाण्यास त्याला दहा मिनिटे उशीर झाला. त्याला परीक्षेस बसण्यास नकार देण्यात आला. संतोष सांगतो, मी परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना खूपदा विनवण्या केल्या. परंतु तू उशिरा आला आहेस, आता काही होऊ शकत नाही, असेच सांगत होते. प्रत्यक्ष परीक्षा दोन वाजता सुरू होणार होती. मी केंद्रावर १.४० वाजता पोहोचलो. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याची अंतिम वेळ १.३० वाजताची होती. केवळ दहा मिनिटांच्या विलंबामुुळे माझे वर्ष वाया गेले. तर परीक्षा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यास उशीर झाला तरी त्याच्याशी संपर्क साधला नव्हता. विद्यार्थ्यांस अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. आता कोलकात्यात या मुद्याने आता राजकीय वळण घेतले आहे.

बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले, नीट व जेईईची परीक्षा रद्द करण्यासंबंधी याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची व थांबण्यासाठी प्रवास करण्यास त्यास मदत करण्याची व्यवस्था केली पाहिजे, असे सांगितले. परंतु विद्यार्थ्यांना याचा त्रासच सहन करावा लागला. यावर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनी सांगितले, मेट्रो रेल्वेने विद्यार्थी कोलकात्यात प्रवास करू शकतात. परंतु, दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांसाठी काय उपाययोजना होत्या ? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण राज्यात सुरू असलेेला लॉकडाऊन रद्द केला होता. तरीही विद्यार्थ्यांना अडचण झाली. मुझफ्फरपूर ते पाटणादरम्यान रस्ता जाम झाला होता.

रस्ता जाम होता : संतोष
मी शनिवारी सकाळी घरातून बाहेर पडलो. सकाळी ८ वाजता दरभंगा ते मुझफ्फरपूर बसमध्ये बसलो. परंतु, रस्ता जाम झाल्याने पाटण्यात पोहोचण्यास ६ तास उशीर झाला. मी रात्री ९ वाजता पाटणा ते कोलकाता बसमध्ये बसलो. बसने मला १.०६ वाजता कोलकात्यातील सियालदह स्थानकावर सोडले. मी तेथून टॅक्सीने परीक्षा केंद्रावर गेलो. परंतु, तेथे जाण्यास दुपारचे १.४० वाजले होते.