आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 71% Of The Population In The Country Is Malnourished; 17 Lakh Deaths Due To Malnutrition, Report Of 'State Of The India's Environment'

सीएसई:देशात 71 % लोकांत पोषण आहाराचा अभाव; पोषणा अभावी 17 लाख मृत्यू, ‘स्टेट ऑफ द इंडियाज एन्व्हायर्नमेंट’चा अहवाल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील ४२ टक्के समुदायाला पोषक आहार मिळत नाही. भारतात ७१ टक्के लोकांसाठी निरोगी आहार दुरापास्त आहे. परिणामी १७ लाखांहून जास्त लोक पोषणाअभावी होणाऱ्या आजारांना बळी पडतात. जीवनशैलीशी संबंधित मधुमेह, श्वसनरोग, कर्करोग, ह्रदयरोग इत्यादीमुळे त्यांचा मृत्यू झाला. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या (सीएसई) ‘स्टेट ऑफ द इंडियाज एन्व्हायर्नमेंट’ अहवालानुसार आहारात फळे, भाज्या-धान्याची कमतरता, प्रक्रियायुक्त मीट, रेड मीट व शुगर ड्रिंक्सच्या जास्त वापरामुळे आजार वाढू लागले आहेत. पोषण आहाराअभावी व्यक्तींमधील अंडरवेट किंवा ओव्हरवेटची समस्या दिसून येत आहे. दूग्ध उत्पादनातून कार्बन उत्सर्जन : अन्न व्यवस्था आणि प्रक्रिया यांचा पर्यावरणावर परिणाम दिसून येतो. ग्रीनहाऊस उत्सर्जनामागे सर्वात मोठे कारण म्हणजे दूग्ध उत्पादनाचे आहे. धान्य उत्पादनासाठी जास्त पाणी, नायट्रोजन व फॉस्फरसचा वापर केला जातो.

१७ राज्यांतील गावांत शहरांपेक्षा जास्त महागाई : अहवालात खाद्यपदार्थांच्या दराचेही विश्लेषण करण्यात आले आहे. गेल्या वर्षी कन्झ्युमर फूड प्राइस इंडेक्समध्ये ३२७ टक्क्यांची वाढ दिसून आली होती. त्यामुळे ग्राहकसंबंधी निर्देशांकात ८४ टक्के वाढ झाली. सीएसईशी संबंधित पर्यावरणतज्ज्ञ रिचर्ड महापात्र म्हणाले, ग्राहक निर्देशांकात वाढ होण्यामागे सर्वात प्रमुख कारण आहार ठरले आहे. ते म्हणाले, गेल्या वर्षी मार्च-एप्रिलदरम्यान पश्चिम बंगाल, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, छत्तीसगड, आसाम, उत्तर प्रदेश, ओडिशा, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीर, गुजरात, झारखंड, उत्तराखंड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या १७ राज्यांतील शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाई जास्त आहे. कुपोषणही मोठ्या स्वरूपात आहे.

२० वर्षांहून जास्त वयाच्या भारतीयांचे डाएट
फळे 35.5 ग्रॅम (200 ग्रॅमचे 18%*)
भाजीपाला 167.8 ग्रॅम (300 ग्रॅमचे 56%*)
शेंंगा 24.9 ग्रॅम (100 ग्रॅमचे 25%*)
सुका मेवा 3.2 ग्रॅम (25 ग्रॅमचे 13%*)
कडधान्य 121.8 ग्रॅम (125 ग्रॅमचे 97%*)
मासे 9.6 ग्रॅम (28 ग्रामचे 34%*)
दूध-दही 107.8 ग्रॅम (250 ग्रॅमचे 43%*)
रेड मीट 3.5 ग्रॅम (14 ग्रॅमचे 25%*)
(* भारतीयांना मिळणाऱ्या आहाराचे प्रमाण)

बातम्या आणखी आहेत...