आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढत आहे. परंतु वाढलेली ही संख्या केरळ व महाराष्ट्रामुळे झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या चोवीस तासांत ३ हजार ७१२ रुग्ण आढळून आले आहेत. त्याच्या एक दिवस आधी २ हजार ७४५ रुग्ण आढळले होते. त्यामुळेच ताजी संख्या ३५.४ टक्के जास्त आहे.
तीन हजारांहून जास्त बाधित आढळून येण्याची ही २५ दिवसांनंतरची पहिलीच वेळ आहे. ६ मे रोजी अशा प्रकारचे बाधित आढळले होते. त्यातही मृत्यूचा दर घटल्याचे दिसून आले. चोवीस तासांत ५ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ३ जण केरळचे होते. महाराष्ट्रात १०८१ बाधित आढळून आले. केरळमध्ये १ हजार १९७ रुग्ण आढळले होते. ही स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळेच नियमांचे पालन होणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.