आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • 72nd Republic Day Live Latest Today News Celebrations Photos Video Updates On Rajpath Republic Day Parade

72 वा प्रजासत्ताक दिन:प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेलने प्रथमच उड्डाण केले, बांगलादेशच्या सैन्य तुकडीचा देखील पहिल्यांदाच सहभाग

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोरोनामुळे राजपथवर आज बरेच बदल पाहण्यास मिळतील

देश आज 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राजपथवर परेडला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथवर उपस्थित आहेत. यावेळी बांग्लादेशची तुकडी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या समारोहात सहभाग घेत आहे. कोरोनामुळे यावेळी परेडचे स्वरूप बदलेले दिसेल. 55 वर्षांत पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी कोणीही प्रमुख पाहुणे सहभागी होणार नाहीत. याआधी भारतात 1952, 1953 आणि 196 मध्ये प्रजासत्ताकदिनी परेडमध्ये कोणतेही प्रमुख पाहुणे सहभागी झाले नव्हते.

अपडेट्स...

भारतीय हवाईदलाची ताकद : प्रजासत्तादिनी हवाईदलाने त्रिनेत्रक रचना केली. याला त्रिशूल रचना देखील म्हटले जाते. यामध्ये एक राफेल लढाऊ विमान देखील समावेश होता. राफेलची पहिली खेप गेल्या वर्षीच भारतीय हवाई दलाला प्राप्त झाली.

- केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर लडाखचा पहिला चित्ररथ यावर्षी परेडमध्ये सामील झाला. यामध्ये राज्याची संस्कृतीचे दर्शन दाखवण्यात आले.- 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बांगलादेशच्या सैन्याची तुकडी मुख्य आकर्षण राहिली. या तुकडीचे नेतृत्व कर्नल अब मोहम्मद शमूर शाबान यांनी केले. आपल्या प्रजासत्ताक दिन समारोहात पहिल्यांदाच बांगलादेशच्या सैन्याने भाग घेतला आहे. या तुकडीत एकूण 122 जवान सहभागी आहेत.

- राजपथ येथील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय सैन्याच्या टँक टी -90 चा समावेश होता. या टँकला सैन्यात भीष्म नावाने ओळखले जाते.

- यावेळी परेडचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा करीत आहेत. तेच परेड कमांडर आहे.

- जामनगरच्या खास पगडीत मोदी : पंतप्रधान मोदी इंडिया गेटच्या नॅशनल वॉर मेमोरियलला पोहोचले. येथे त्यांनी सेरेमोनियल पुस्तकारव स्वाक्षरी केली. यावेळी त्यांनी गुजरातच्या रॉयल फॅमिलीने भेट म्हणून दिलेली एक खास पगडी घातली होती.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राजपथवर आज कोणते बदल दिसतील?

 • परेडमध्ये भाग घेणार्‍या चित्ररथांची संख्या 70 वरून 32 करण्यात आली आहे. यामध्ये 19 चित्ररथ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचे असतील. 9 चित्ररथ वेगवेगळ्या मंत्रालयांचे असतील. तर सुरक्षदलाचे 6 चित्ररथ असणार आहेत.
 • परेडमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने फेस मास्क घातलेला असेल. प्रवेशद्वारावर प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल आणि सर्वांचे हात सॅनिटाइज केले जातील.
 • परेडमध्ये मार्च पास्ट करणारे सैन्य कंटीन्जेंटमध्ये 144 ऐवजी 96 लोक असतील.
 • यावेळी सव्वा लाख लोकांऐवजी केवळ 25 हजार लोक राजपथावर परेड पाहतील.
 • 15 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना आणि वृद्धांना राजपथावर येण्याची परवानगी नसेल.
 • पूर्वी परेड विजय चौक ते लालकिल्ला अशी 8.2 किमी लांब असायची. यावेळी मात्र विजय चौक ते नॅशनल स्टेडियम 3.3 किमी असेल.
 • बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी भावना कांत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दाखल होणारी पहिली महिला पायलट पायलट असेल.
 • यावर्षी परेडमध्ये पहिल्यांदा राफेलची झलक दिसेल, ते व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशनमध्ये उड्डाण घेईल.
 • शौर्य पुरस्कारांची परेड आणि शौर्य पुरस्कार विजेते मुले देखील 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभास उपस्थित राहणार नाहीत.
 • शाळा-महाविद्यालयातील 100 गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधान बॉक्समधून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याची संधी मिळणार आहे.

प्रथमच व्हॅक्सीनचा चित्ररथ सामील होणार

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाचा (DBT) चित्ररथ सामील होणार आहे. त्यामध्ये विभागाकडून कोरोना लसविषयी माहिती सांगण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...