आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 73% Of 6th To 12th Students In Country Satisfied With School Life, NCERT's Mental Health Survey Released

सर्वेक्षण:देशात 6 वी ते 12 वीपर्यंतचे 73% विद्यार्थी शालेय जीवनात समाधानी, एनसीईआरटीचे मानसिक आरोग्य सर्वेक्षण जारी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय जीवनातील ताण-तणाव, मोकळे वातावरण याचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. विद्यार्थी घडताना शालेय जीवनातील मानसिक आरोग्य महत्त्वाचा घटक ठरतो. याबाबत केलेल्या सर्वेक्षणातदेशात ६ वी ते १२ वीपर्यंतचे ७३% शालेय विद्यार्थी शालेय जीवनाबाबत समाधानी असल्याचे समोर आले आहे, ३३% टक्क्यांचे मन अभ्यासात रमत नाही. कोरोना महामारीदरम्यान ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. सर्वेक्षणात हेही समोर आले की, ५१% विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमाद्वारे शिक्षण समजून घेण्यात अडचण आली. २८ टक्के प्रश्न विचारायला धजावत नाहीत. सर्वेक्षणात ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ३.७९ लाख विद्यार्थी सहभागी झाले.

शिक्षण, परीक्षा आणि निकाल चिंतेचे प्रमुख कारण : सर्वेक्षणात सहभागी ८१ टक्के मुले अभ्यास, परीक्षा आणि निकालास सर्वात जास्त तणाव मानतात. सामान्यपणे बहुतांश मुलांनी शालेय जीवनाबाबत समाधान आणि आनंद व्यक्त केला. दुसरीकडे, माध्यमिक विद्यालयात बहुतांश शाळकरी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यात घसरण आली आहे. हे सर्वेक्षण एनसीईआरटीचा मनोदर्पण विभाग आणि शैक्षणिक मानसशास्त्र तसेच शिक्षण विभागाने जानेवारी ते मार्चदरम्यान ६ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची धारणा समजून घेण्यासाठी केले आहे.

शिक्षण पर्वाच्या रूपात केले सर्वेक्षण सर्वेक्षण शिक्षक पर्वादरम्यान केंद्राद्वारे सुरू केलेल्या अनेक पैलूसोबत सुरू केले होते. कोरोना महामारीनंतर देशात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे आकलन करण्यासाठी केंद्राने केलेले हे पहिले सर्वेक्षण आहे. शिक्षकांना सन्मानित करणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण(एनपीई) २०२० लागू करण्यासाठी शिक्षक पर्व साजरे झाले. कोरोना महामारीमुळे दीर्घकाळ शाळा बंद राहणे, ऑनलाइन वर्ग, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) परीक्षांत बदल, परीक्षा स्थगित होणे आणि निकालासारख्या शालेय प्रणालीतील मोठ्या बदलामुळे लाखो विद्यार्थ्यांवरही थेट परिणाम झाला.

बातम्या आणखी आहेत...