आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 75 Terrorists Killed In Jammu And Kashmir This Year, Locals Support Security Forces

बदलते चित्र:जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी 75 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलास स्थानिकांचा पाठिंबा

जम्मू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये यंदा १६८ दहशतवादी सक्रिय आहेत. परंतु त्यांच्याविरोधात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ७५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले आहे. त्यात २१ परदेशी दहशतवादी होते. गेल्या ११ महिन्यांत ११ दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले आहे.

राज्यातील परिस्थितीत चांगल्या प्रकारे सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. कारण या भागात तैनात सुरक्षा दल अत्याधुनिक शस्त्रास्त्रदृष्ट्या सज्ज आहे. त्यातून आता राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. हळूहळू राज्यात शांतता नांदू लागली आहे, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. २०२१ मध्ये लष्कराने १८० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यापैकी १८ परदेशातील दहशतवादी होते. सक्षम गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य होऊ शकले, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमधील चित्र पालटू लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...