आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर सातत्याने कोसळत असलेल्या अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये शुक्रवारी चांगली सुधारणा झाली. जागतिक रेटिंग एजन्सीचा कल बदलल्याचा परिणाम झाला. अर्थसचिव टी.व्ही. सोमनाथन म्हणाले की, अदानींच्या शेअरमधील पडझडीमुळे होणारा उतार-चढ मॅक्रो-इकॉनॉमिक दृष्टीने ‘चहाच्या कपात उठलेल्या वादळा’सारखे आहे. रिसर्च अॅनालिस्टच्या मते रिकव्हरी दोन प्रमुख कारणांमुळे झाली. पहिले, फिच रेटिंग्सने म्हटले की, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरच्या घसरणीने कंपनीच्या रेटिंगवर तातडीने परिणाम होणार नाही. दुसरे, फ्रान्सची ऊर्जा कंपनी टोटल एनर्जीने म्हटले की, ते अदानींच्या कंपनीतील आपल्या हिस्सेदारीचे समीक्षण करणार नाही. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी वाढली. दरम्यान, अमेरिकी शेयर बाजार एस&पी डाउ जोन्सने अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स स्थिरता निर्देशांकातून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकी बाजाराने इंडेक्स घोषणेत म्हटले की, ७ फेब्रुवारीपासून शेअर्स हटवले जातील. समूहातील तीन शेअर्स अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट यांच्याबाबत हा निर्णय असून हे शेअर्स एएसएम (अतिरिक्त देखरेख उपाय) च्या यादीत समाविष्ट केल्यानंतरच हे पाऊल उचलले गेले.
लोकसभा -राज्यसभा ठप्प, देशभरात ६ फेब्रुवारीला काँग्रेसची निदर्शने
{हिंडेनबर्ग अहवालावर लोकसभा आणि राज्यसभेत शुक्रवारीही कामकाज होऊ शकले नाही. विरोधकांनी जेपीसीची मागणी केल्यानंतर संसद आधी दुपारपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावी लागली.
{हिंडेनबर्गच्या अहवालावरून काँग्रेस ६ फेब्रुवारीला देशभरात निदर्शने करणार आहे.
{अदानी समुहाचे प्रकरण शुक्रवारी सुप्रीम कोर्टात गेले. जनहित याचिकेत हिंडेनबर्ग रिसर्चची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
{रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार भारतीय बँक पूर्णपणे सुदृढ स्थितीत आहे. रोकडची उपलब्धा गरजेनुरूप आहे. बँक ५ कोटींहून जास्त वैयक्तिक कर्जाची माहिती सीआरआयएलसीला देते.
{ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे बंधू जो जॉन्सन यांनी अदानी समुहाशी संबंधित फर्म एलारा कॅपिटलचे संचालकपद सोडले आहे.
१८ महिन्यांत जेवढे कमावले, ७ सत्रांमध्ये गमावले
फोर्ब्जच्या रिअल टाइम बिलियनेयर्स यादीनुसार अदानी सर्वात २० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर गेले. आता ते ५.०१ लाख कोटी रु. सह (६१.३ अब्ज डॉलर) २२ व्या स्थानी आहेत. ७ ट्रेडिंग सत्रांत त्यांची एकूण संपत्ती सुमारे २२% म्हणजे ४.७४ लाख कोटी रुपये (५८ अब्ज डॉलर) घटली. ही संपत्ती त्यांनी १८ महिन्यांत कमावली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये संपत्ती याच स्तरावर होती. यात रिलायन्सचे मुकेश अंबानी ६.७८ लाख कोटींसह ११ व्या स्थानी आहेत.
एसबीआयचा नफा ६८.५% वाढला : एसबीआयचा या तिमाहीतील नफा ६८.५% वाढून १४,२०५ कोटी रु. मागील वेळी ८,४३२ कोटी होता.
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, एसबीआय आणि एलआयसीची अदानी समूहांत मर्यादित गुंतवणूक आहे. घसरणीतही ते नफ्यात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.