आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 7th International Yoga Day Tomorrow, Prime Minister Modi Will Address The Program At 6.30 Am, This Time The Theme Is 'Yoga For Wellness'.; News And Live Updates

जागतिक योग दिवस:मोदी म्हणाले - कोरोनाविरूद्धच्या लढाईत योग हा आशेचा किरण; कठीण काळात याविषयी लोकांमध्ये वाढले आकर्षण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावेळी 190 देशांमध्ये योग दिवस साजरा करण्यात येणार

आज संपूर्ण जगात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. यावर्षीचा योग थीम 'योगा फॉर वेलनेस' अशी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे देशातील जनतेला संबोधित करत आहे. आज संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. या लढाईत योग हा आशेचा किरण समोर आला असल्याचे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे जगात कोणतेही मोठे कार्यक्रम झाले नाहीत. परंतु, तरीदेखील योग दिवसावर लोकांचे उत्साह कमी झाले नाही. यावर्षीचा योग थीम 'योगा फॉर वेलनेस' असून याने लोकांमध्ये आकर्षण वाढवले आहे. मी आशा करतो की, प्रत्येक देश, समाज आणि व्यक्ती निरोगी रहावे.

सुख आणि दु:खामध्ये समानता ठेवण्यासाठी आमच्या ऋषीमुनींनी संयमाला योगाचे मापदंड बनवले होते. आज कोरोना महामारीने हे सिद्ध करुन दाखवल्याचे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारतासह अनेक लहान मोठे देश आज कोरोना महामारीशी लढले आहे. जगातील मोठ्या देशांसाठी योग दिवस हा त्यांचा सांस्कृतिक उत्सव नाही. परंतु, तरीदेखील ते सर्व याचे अनुसरण करत आहेत. या कठीण काळात योगाविषयी लोकांची आसक्ती वाढली असल्याचे मोदी म्हणाले.

मोदी यांच्या संवादातील पाच महत्वाच्या गोष्टी

1. कोरोनादरम्यान योग आत्मविश्वासाचे एक उत्तम माध्यम बनले
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाकाळात योग हे आत्मविश्वासाचे एक उत्तम माध्यम बनले. योगामधील पहिला पर्याय संयम आणि शिस्तीला दिले आहे. कारण कोरोना महामारीदरम्यान संपूर्ण जग मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. योगामुळे लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा आत्मविश्वास वाढला असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मी जेव्हा फ्रंटलाईन वकर्सशी बोलतो तेंव्हा ते कोरोनाच्या लढाईत योगाला सामील करत असल्याचे सांगतात. देशातील अनेक रुग्णालयांतून रुग्ण योगा करीत असल्याचे समोर आले होते असेही ते म्हणाले.

2. योगावर जगात वैज्ञानिक संशोधन केले जात आहे
अनुलोम-विलोममधून श्वसन प्रणालीला किती सामर्थ्य मिळते हे जगाचे तज्ञ सांगत आहे. रोगाच्या मुळाशी जाऊन त्याचे उपचार करणे गरजेचे असल्याचे तमिळ योग तिरुवल्लुवर म्हणतात. मोदी म्हणाले की, आज वैद्यकीय विज्ञान उपचाराबरोबरच या उपचार प्रक्रियेलाही तितकेच महत्त्व देत आहे. योगाबद्दल जगभरात वैज्ञानिक संशोधन केले जात असून यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीवर योगाच्या किती सकारात्मक परिणाम पडतो याचादेखील संशोधन केले जात असल्याचे मोदी म्हणाले.

3. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी योगा मुलांना तयार करत आहे.
आज प्रत्येक ऑनलाईन वर्गात 10 ते 15 मिनटे मुलांना योग शिकवण्यात येत आहे. योग हे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुलांना तयार करत आहे. कारण चांगले स्वास्थ हे सर्व यशाचे गमक असल्याचे मोदी यांनी सांगितले. योग हे मानवाला शाररिक आणि मानसिक बळ देत असल्याचे ते म्हणाले.

4. एम-योग अ‍ॅपचा जगाला फायदा होईल
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सरकारने जेव्हा संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. तेंव्हा यांचा संपूर्ण जगाला फायदा होईल असा विचार केला होता. भारत आता जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने एम-योग अॅप सुरू करणार आहे. यामुळे या अ‍ॅपमध्ये योगासनांचे वेगवेगळे आसन आणि इतर माहिती उपलब्ध राहणार आहे. जी वेगवेगळ्या भाषांमध्ये असेल.

5. योगामध्ये सर्वांचे समाधान
विभक्तीपासून मुक्तीला योग म्हणतात असे गीतेत असे म्हटले असल्याचे मोदी म्हणाले. कुठलीही जागा, परिस्थिती किंवा वय असो योगामध्ये सर्वांचे समाधान असल्याचे ते म्हणाले. आज जगात योगाविषयी जाणून घेण्यास आणि योग प्रतिष्ठानांमध्ये वाढ होत आहे. अशावेळी योगाची मूलभूत तत्त्वे सर्व लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला योगाची प्रतिज्ञा घ्यावी लागेल आणि आपल्या प्रियजनांना यासाठी जोडावे लागणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेळ.

ट्विटरवरुन दिली होती माहिती

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया हँडल ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहले की, उद्या 21 जूनला 7 वा योग दिवस साजरा करणार आहे. यावर्षीचा थीम 'योग फॉर वेलनेस' असणार आहे. जी शारीरिक आणि मानसिक निरोगीपणाला समर्पित असेल.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये आयुष राज्यमंत्री किरेन रिजिजू यांचे संभाषण आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या योगा प्रदर्शनचे थेट प्रक्षेपणही असेल. परदेशातही याचे प्रक्षेपण केले जाणार असून यावेळी 190 देशांमध्ये योग दिवस साजरा करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील व्यायामाचे मोदींचे हे चित्र खूप व्हायरल झाले. पंतप्रधानांनी 13 जून 2018 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हे चित्र पोस्ट केले
पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील व्यायामाचे मोदींचे हे चित्र खूप व्हायरल झाले. पंतप्रधानांनी 13 जून 2018 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हे चित्र पोस्ट केले

कोरोना महामारीतील दुसरा योग दिवस
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी योग दिवस हे कोरानाचे बंधन पाळत साजरा करावे लागणार आहे. गेल्या वर्षी 6 वा आंतरराष्ट्रीय योग दिवसदेखील असाच साजरा करण्यात आला होता. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाने 'योग फॉर हेल्थ-योग फ्रॉम होम' अशी थीम ठेवली होती. या योग दिवसावरदेखील मास्क, सोशल डिस्टेन्सिंग ठेवत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आला आहे.

पहिला योग दिवस 2015 मध्ये साजरा करण्यात आला
जगातील पहिला योग 21 जून 2015 मध्ये साजरा करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील राजपथवरुन सुमारे 35 हजार 985 लोकांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे 21 योगासने केली.

बातम्या आणखी आहेत...