आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 8 Dead After A Fire Broke Out At A Hotel In Secunderabad । Fire Broke Out In Electric Scooter Recharging Unit On Ground Floor, Smoke From Which Overpowered The People Staying On 1st & 2nd Floors

हैदराबादच्या हॉटेलमध्ये आग, 8 जण दगावले:ई-स्कूटर रिचार्ज युनिटमुळे पसरली आग, गुदमरून मृत्यू, अनेकांनी खिडक्यांतून मारल्या उड्या

हैदराबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद येथील एका हॉटेलला सोमवारी रात्री 10 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हैदराबादचे आयुक्त सीव्ही आनंद यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, अग्निशमन दल वेळेवर पोहोचले होते. बचावकार्य वेगाने करण्यात आले, मात्र धूर खूप जास्त होता आणि त्यामुळे काही लोकांना जीव गमवावा लागला.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

पीएम मोदींनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की- "दुर्घटनाग्रस्त कुटुंबांप्रति शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना." अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.

रात्री रिचार्ज युनिटला आग लागली

उत्तर विभागाच्या डीसीपी चंदना दीप्ती यांनी सांगितले की, हॉटेलच्या तळमजल्यावर इलेक्ट्रॉनिक स्कूटर रिचार्ज युनिट होते. इलेक्ट्रिक बाइक ठेवलेल्या तळघरात काल रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली. आग कुठे लागली हे कळू शकले नाही. येथून आग पसरली. आगीने पहिला आणि दुसरा मजला जळून खाक झाला. धुराचे लोट प्रचंड होते आणि गुदमरून लोकांना जीव गमवावा लागला.

वृत्तानुसार, घटनेच्या वेळी इमारतीत 25 लोक होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांनी हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. काहींनी तर जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या मारल्या.

आग लागल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
आग लागल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
वरच्या मजल्यावर असलेल्या हॉटेलमधून लोकांची अशी सुटका करण्यात आली.
वरच्या मजल्यावर असलेल्या हॉटेलमधून लोकांची अशी सुटका करण्यात आली.

तमिळनाडूतही घडली होती अशीच घटना

तमिळनाडूमध्ये एप्रिल महिन्यात अशीच एक घटना घडली होती. येथील पोरूर-कुंदरातूर शोरूममध्ये एका ग्राहकाने आपल्या ई-बाईकची बॅटरी चार्ज करण्यासाठी लावली होती. काही वेळातच आग लागली. हळूहळू संपूर्ण शोरूम आगीत जळून खाक झाले. या घटनेत 5 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि सर्व्हिसिंगसाठी आलेल्या 12 जुन्या इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या.

संपूर्ण शोरूम झाले होते बेचिराख

आग लागल्यानंतर शोरूममधून धुराचे लोट उठू लागले, जे पाहून लोक घाबरले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक जमा झाल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने जमाव हटवण्यात आला. मात्र, आगीच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, ही दिलासादायक बाब आहे. तेव्हा स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली होती, मात्र तत्पूर्वी संपूर्ण शोरूम जळून खाक झाले होते.

बातम्या आणखी आहेत...