आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 दिवसांच्या बाळाच्या पोटातून काढले 8 भ्रूण:डॉक्टर म्हणाले - देशातील दुर्मिळ घटना, आतापर्यंत केवळ 1-2 भ्रूणच निघाले होते

रांचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रांचीतील एका 21 दिवसाच्या मुलीच्या पोटातून 8 भ्रूण काढण्यात आलेत. ही एक आश्चर्यकारक घटना आहे. शस्त्रक्रिया डॉक्टरांनीही यामुळे आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले - 'आम्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती. कारण, रिपोर्टमध्ये तसे स्पष्ट झाले नव्हते. पण ऑपरेशन करताना आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. हे अत्यंत दुर्मिळ घटना आहे. आतापर्यंत जेवढ्या घटना उजेडात आल्यात, त्यात एक किंवा 2 भ्रूणच निघाले होते. देशात आतापर्यंत अशा 10 घटना घडल्या आहेत.'

मुलीचे आई-वडील रामगडचे आहेत. मुलीचा गत 10 ऑक्टोबर रोजी जन्म झाला. तिच्या पोटावर सूज होती. त्यामुळे जन्मानंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. राणी चिल्ड्रन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिचे सिटी स्कॅन केले. त्यात मुलीच्या पोात डर्माइट सिस्ट दिसून आले. त्यात शरीरात काही सेल्स आढळतात. ऑपरेशननंतर तिच्या पोटातून 8 भ्रूण काढण्यात आले.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचार

बाळ 2 दिवसांचे होते. तसेच त्याच्यावर उपचार आयुष्मान भारत योजनेंतर्गत करावयाचे होते. त्यामुळे प्राथमिक उपचारानंर तिला सुट्टी देण्यात आली. त्यानंतर 21 दिवसांनी पुन्हा त्यांना बोलावण्यात आले.

जगातील पहिले प्रकरण

राणी चिल्ड्रेन रुग्णालयाचे डॉक्टर इम्रान म्हणाले की, 'पोटातून एकाचवेळी 8 भ्रूण निघण्याचे जगातील हे पहिले प्रकरण आहे. याला फीट्स इन फीटू म्हणतात. ही अत्यंत दुर्मिळ अवस्था आहे. असे जगभरात केवळ 200 प्रकरणे आढळली. तेही पोटातून केवळ एक भ्रूण काढण्यात आला. पण या 21 दिवसांच्या नवजात मुलीच्या पोटातून तब्बल 8 भ्रूण काढण्यात आले. याचा आम्हालाही धक्का बसला.'

काय आहे कारण

डॉक्टर इम्रान म्हणाले की, 'आईच्या पोटात बाळ बनते तेव्हा ते अनेक भ्रूणांसह तयार होते. त्यापैकी एक भ्रूण तयार होतो. देशात 8-10 केस रिपोर्ट आहेत. त्यात एक किंवा दोन भ्रूण निघालेत. पण एकाचवेळी 8 भ्रूण निघणे वैद्यकीय इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. 5 ते 10 लाख मुलांमध्ये एकात असे घडते.'

देशात आतापर्यंत अशा 10 घटना

पाटण्याच्या गायनाकॉलजिस्ट डॉ. अनुपमा शर्मा यांनी सांगितले की, 'ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. फीटस इन फीटूमध्ये मुलाच्या पोटात मूल तयार होते. गर्भात एकाहून जास्त बाळ असतील तर भ्रूणाचा विकास होताना काही सेल्स बाळाच्या पोटात जातात. त्यामुळे त्यांची तिथेच निर्मिती होते. पण सेल्स आत कसे जातात. याचा कोणताही ठोस पुरावा नाही. आतापर्यंत सांगण्यात आलेली सर्वच कारणे अंदाजावार आधारित आहेत. लक्षांवर बोलायचे झाले तर बाळ जन्माला आले तेव्हा त्याच्या पेल्विस म्हणजे पेडूच्या भागात सूज असते. एक लम्प असतो. लघवी येणे बंद होते. खूप वेदना होतात. या लक्षणानंतर डॉक्टर तपासणी करतात. त्यात ही गोष्ट निष्पन्न होते.'

ट्यूमरही असू शकतो

पाटण्याचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर हिमांशु राय यांनी सांगितले की, 'काही प्रकणात जर्म सेल ट्यूमर असतो. या प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल.'

बातम्या आणखी आहेत...