आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 8 Killed And 4 Seriously Injured In Truck Accident Near Barda Village In Savarkundla Gujarat

गुजरातमध्ये भीषण अपघात:सावरकुंडला येथील बरडा गावाजवळ झोपडपट्टीत ट्रक घुसला, 25 जणांना चिरडले; 8 जागीच ठार, 4 जण गंभीर

अमरेली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील बरडा गावाजवळ एक ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत घुसला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. 16 लोक जखमी झाले आहेत. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांना सांवरकुंडला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रक भावनगर जिल्ह्यातील महुवा शहराच्या दिशेने जात होता.

स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली
ट्रक 5-6 झोपडीत घुसल्याचे सांगितले जात आहे. अपघाताच्या वेळी 20-25 लोक झोपडीत झोपलेले होते. लोकांना तुडवल्यानंतर ट्रक खड्ड्यात पडला. लोकांचा आरडाओरडा ऐकून जवळच्या गावातील लोक मदतीसाठी धावले. त्यांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना माहिती दिली.

मृतांच्या नातेवाईकांना 4-4 लाख रुपयांची मदत
मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच ते म्हणाले, जखमींवर उपचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही याविषयी मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे.

बातम्या आणखी आहेत...