आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंध्रप्रदेशात भीषण अपघात:नेल्लोरमध्ये ट्रक-ऑटोरिक्षा अपघातात 8 लोकांचा मृत्यू, सर्वजण तीर्थयात्रा करून गावी परत निघाले होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्रप्रदेशातील नेल्लोरमध्ये रविवारी सकाळी ऑटोरिक्षा आणि ट्रक अपघातामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार दमरमादुगु गावामध्ये सकाळी-सकाळी ऑटोरिक्षा आणि ट्रकची धडक झाली. या अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व लोक तामिळनाडूचे असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर नेल्लोर येतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तीर्थयात्रा करून येत होते लोक
हा अपघात रात्री 2 च्या सुमारास झाल्याची माहिती समोर येत आहे. तामिळनाडू येथील यात्रेकरूंनी भरलेला एक ऑटोरिक्षा श्रीशैल्यम मंदिर आणि इतर तीर्थस्थानांची यात्रा करून गावी परत निघाला होता. प्रवासात ड्रायवरचे ऑटोवरील नियंत्रण सुटले आणि दमरमादुगु गावातील एका पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या टेम्पोला जाऊन ऑटो धडकला.

बातम्या आणखी आहेत...