आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९९७ ची गोष्ट आहे. तेव्हा मिताली राज केवळ १४ वर्षांची होती. वर्ल्डकपमधील संभाव्य खेळाडू असतानाही कमी वयामुळे तिची निवड झाली नव्हती. या स्पर्धेच्या दोन वर्षांनंतर मितालीला आयर्लंडविरुद्ध सामना खेळण्याची संधी मिळाली. वर्ल्डकप न खेेळल्याची सल कायम होती. तिने ११४ धावांची नाबाद खेळी खेळून उत्तर दिले. २३ वर्षांच्या विक्रमी क्रिकेट प्रवासात मितालीने मैदान आणि मैदानाबाहेरील प्रत्येक अडथळा दूर केला आणि चॅम्पियन बनून उभारी घेतली. याची काही उदाहरणे बघा. मिताली पारंपरिक दक्षिण भारतीय कुटुंबात जन्मली. वडील राज हवाई दलात अधिकारी होते. ८ वर्षांची छोटी मुलगी कथक शिकत होती. परंतु प्रत्येक लेकराप्रमाणे तिला झोप आवडत होती आणि सकाळी उठण्यास टाळाटाळ करत होती. तेव्हा वडिलांनी मितालीचा आळस दूर करण्यासाठी भावासोबत तिला हैदराबादच्या सेंट जोन्स कोचिंग फाउंडेशनच्या क्रिकेट मैदानावर नेणे सुरू केले. तेव्हा ती मैदानाच्या सीमेवर बसून शाळेचा गृहपाठ करत होती. मितालीचे २१ वर्षे प्रशिक्षक राहिलेले आर.एस. मूर्ती यांनी दैनिक भास्करला सांगितले, ‘मिताली आपल्या लहान भावाला सिकंदराबादच्या सेंट जोन्स कोचिंग फांउडेशनच्या क्रिकेट मैदानावर सरावानंतर घ्यायला येत होती. एका दिवशी लाइनहून बाहेर गेलेले अनेक चेंडू तिने मैदानात फेकले. हे बघून आमच्या एका कोचने या मुलीत दम आहे, असे म्हटले आणि अशा रीतीने तिचा क्रिकेट मैदानात प्रवेश झाला. यानंतरची सर्व कहाणी तुमच्या समोर आहे.’ त्या काळी मुलींचे क्रिकेट खेळणे आश्चर्यचकित करणारे होते.
खूप कमी मुलीच क्रिकेट खेळत होत्या. मितालीला मुलांसोबत क्रिकेट खेळावा लागत होता. तेथे तिला टोमणे ऐकावे लागत होते की क्रिकेट खेळणे मुलींच्या आवाक्यातले नाही. मितालीने ते आव्हान म्हणून स्वीकारत कथ्थक सोडून क्रिकेटला गांभीर्याने स्वीकारले. मितालीने स्वत: मुलाखतीत सांगितले की, नृत्य तिच्या हृदयाच्या जवळ होते. ती आवड म्हणून जपत होती. परंतु, क्रिकेटविषयी सगळ्या गोष्टी इतक्या गंभीर झाल्यात ती याशिवाय दुसरा काहीच विचार करू शकत नव्हती. मैदानाबाहेरही ती भिडलेली होती. एक वेळ तिला विचारले गेले की, तुझा आवडता पुरुष क्रिकेटर कोण आहे? यावर तिने पलटवार केला आणि विचारले की, तुम्ही पुरुष क्रिकेटरना तुम्ही आवडीची महिला क्रिकेटर कोण आहे, असे विचारता का?
आता मितालीच्या झुंज देण्याच्या गुणाबद्दल बघा. त्यावर विश्वास करणे कठीण आहे. टेस्ट करियरच्या पहिल्या डावात मिताली खाते उघडू शकली नाही. दुसऱ्या टेस्टमध्ये तिने इंग्लंडिवरुद्ध २१४ धावा केल्या. हा त्यावेळी महिला कसोटी क्रिकेटमध्ये एखादा खेळाडूने केलेली सर्वात मोठी धावसंख्या होती. २००५ च्या वर्ल्डकममध्ये भारत फायनलमध्ये पोहोचण्यात मितालीचे महत्त्वाचे योगदान होते. गुडघ्याला दुखापत असतानाही तिने कर्णधार म्हणून न्यूझिलंडविरुद्ध ९१ धावांची खेळी केली. ती देशातील एकमेव अशी खेळाडू होती जिने दोन वर्ल्ड कप फायनल खेळले. एवढेच नाही, सहा वर्ल्ड कप खेळणारी एकमेव भारतीय आहे. खेळाडूच हा टप्पा गाठू शकले. तथापि, भारतीय महिला टीमचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अजूनही अधुरेच आहे.
२३ वर्षांत २०० वनडे खेळणारी पहिली महिला खेळाडू -महिला वनडेमध्ये मितालीच्या ७८०५ धावा असून तो विश्वविक्रम आहे. -मितालीने २३२ वनडे खेळले, हाही एक जागतिक विक्रम आहे. -मिताली २२ वर्षे वयातच कर्णधार बनली, हाही जागतिक विक्रम आहे. -१६ व्या वर्षी शतक करणारी सर्वात तरुण खेळाडू आहे. -टी-२० मध्ये शतक करणारी देशातील पहिली महिला क्रिकेटर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.