आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 81 Thousand New Corona Patients In 24 Hours; Vaccination Will Also Be Available On Holidays

लढा कोरोनाशी:24 तासांत 81 हजार नवे रुग्ण; सुटीच्या दिवशीही लस मिळणार, लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राचा आदेश

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत सर्व विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यास बंदी

कोरोनाने पुन्हा मोठे आव्हान उभे केले आहे. देशात गुरुवारी ८१,३८० रुग्ण वाढले. हा यंदाचा उच्चांक आहे. देशात इतके रुग्ण गतवर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीस आढळले होते. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ४३,१८३ रुग्ण आढळले. हा राज्याचा कोरोनाकाळातील सर्वात मोठा आकडा आहे. गुरुवारी देशात ४६८ मृत्यू झाले. हा यंदाचा उच्चांक आहे.

दरम्यान, देशात १ एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. त्यात ४५ व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस दिली जात आहे. लसीकरण केंद्रांच्या कमाल क्षमतेचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आदेश जारी केला. त्यानुसार एप्रिलमध्ये सरकारी व खासगी केंद्रांवरही दररोज लस दिली जाईल. म्हणजे सरकारी सुट्टीच्या (गॅझेटेड हॉलिडे) दिवशीही लसीकरण केंद्रे खुली राहतील. या महिन्यात चार रविवारसह चार मोठे सण-दिवसही आहेत. २ एप्रिलला गुड फ्रायडे, १३ ला गुढीपाडवा, १४ ला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, २१ ला रामनवमीची सुटी आहे. ४ रविवारही आहेत. महावीर जयंती सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी, २५ एप्रिलला आहे.

सक्रिय रुग्ण वाढले : मास्क वापर नाही, ना डिस्टन्सिंग; परिणामी, सक्रिय रुग्ण वाढून सहा लाखांच्याही पार
- देशात सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढून ६ लाखांपार गेली आहे. सक्रिय रुग्ण म्हणजे रुग्णालय वा घरात उपचार सुरू असलेले लाेक.
- मार्चपासून देशात सक्रिय रुग्ण सातत्याने वाढत आहेत. १८ फेब्रुवारीला १.३६ लाख सक्रिय रुग्ण होते. ३१ मार्चपर्यंत हा आकडा ६.१० लाख झाला.

महाराष्ट्रात मार्च महिन्यात ६.५१ लाख रुग्णवाढ
महाराष्ट्रात कोराेनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. राज्यात २८ मार्चला ४०,४१४ रुग्ण आढळले होते. यानंतर ३१ मार्चला ३९,५४४ रुग्ण वाढले. गुरुवारी हा आकडा वाढून पुन्हा ४३,१८३ झाला.
- महाराष्ट्रात मार्च महिन्यात ६.५१ लाख नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंतच्या ५ महिन्यांत ७.३८ लाख जणांना काेरोना झाला. छत्तीसगड, पंजाब, गुजरात व एमपीमध्येही रुग्ण वेगाने वाढतच आहेत.

लसोत्सव : वयाेमर्यादा कमी होताच लागल्या रांगा
गुरुवारपासून ४५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू झाल्याने मोठा उत्साह दिसला. अनेक केंद्रांवर रांगा लागल्या.

कोरोनाचा ट्रेंड
फ्रान्स पुन्हा लॉक
: राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारपासून फ्रान्समध्ये ३ आठवड्यांचा लॉकडाऊन लावला. हा तिसरा लॉकडाऊन आहे. सविस्तर. देश-विदेश
मध्य प्रदेशात ३ जिल्हे लॉक : छिंदवाडात गुरुवारी, तर खरगोन व रतलाम जिल्ह्यात शुक्रवार ते सोमवार पहाटे ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन केला जाणार आहे.
देशात डिसेंबरनंतर मृत्यू घटले होते. ६ फेब्रुवारीला त्याचा नीचांक होता. यानंतर वेगाने वाढ झाली. मार्चच्या सुरुवातीस रोजच्या मृतांची संख्या १०० पार झाली होती. शेवटच्या आठवड्यापर्यंत मृतांचा आकडा ५०० च्या जवळपास गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...