आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 81,000 Laborers Came To Delhi In Five Days; Out Of 1 Crore, 45 Lakh Trucks Are Back On The Roads

देशातील कामकाज पूर्वपदावर:पाच दिवसांत दिल्लीत आले 81 हजार मजूर; 1 कोटीपैकी 45 लाख ट्रक पुन्हा रस्त्यांवर

शरद पांडेय | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशेष रेल्वेत 100% पेक्षा अधिक बुकिंग, सणासुदीत 70 लाख ट्रक असतील रस्त्यावर

कोरोनामुळे गावी गेलेले मजूर आता पुन्हा शहरात येत आहेत. रेल्वे मंत्रालयानुसार, २७ से ३० जून या काळात दिल्लीत सर्वाधिक ८१ हजार लोक आले. याशिवाय मुंबई, अहमदाबाद सुरत, अमृतसर, सिकंदराबाद, जोधपूरला येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष रेल्वेत १००% पेक्षा अधिक बुकिंग होत आहे. लॉकडाऊनच्या काळात साधारण ५% ट्रक मालाची वाहतूक करत होते. आता ही संख्या ४५% वर पोहोचली आहे. देशात एक कोटीपेक्षा जास्त ट्रक धावत आहेत. अॉल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी नवीन गुप्ता म्हणाले, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत ७०% ट्रक रस्त्यावर असतील. सुरत, अहमदाबाद व मुंद्रा, कांडला पोर्ट येथे ६०% मजूर कामावर येत आहेत.

दिल्ली ५७ आणि मुंबईकडे धावताहेत ४८ रेल्वे

बिहार, उत्तर प्रदेश, प. बंगाल, ओडिशा आणि आसाममध्ये सर्वाधिक मजूर परत येत आहेत. राजधानी दिल्लीशिवाय मुंबई, अहमदाबाद, सुरत, अमृतसर, जयपूर येथेही हजारो लोक कामावर परत येत आहेेत. सर्वाधिक ५७ रेल्वे दिल्ली, तर मुंंबईसाठी ४८ रेल्वे धावत आहेत.

आता ४५ लाख ट्रक

> देशात १ कोटी ट्रक  > कोविडच्या आधी सुरू होते ९०-९५ लाख  > लॉकडाऊनमध्ये ४-६ लाख  > सध्या ४०-४५ लाख  > सणांच्या काळात धावतील ७० लाख.

गुजरातमध्ये रोज ७ ते ८ हजार मजूर परत येताहेत

> गुजरातमध्ये रोज ७ ते ८ हजार मजूर परत येत आहेत. पोर्टला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कांडला पोर्ट येथे मार्चमध्ये १,५७५ मजूर होते. आता १,४७० आहेत.

0