आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागडी सामग्री उदा. मोबाइल, कार, एसी किंवा टॅब्लेट,लॅपटॉप, कंपनी वॉरंटी देऊन हात झटकते. मात्र, कंपनीने एंड ऑफ लाइफ सर्व्हिस दिनांक सांगितली पाहिजे. यामुळे संबंधित वस्तू किती दिवस चालेल हे निश्चित होऊ शकेल. सुटे भाग बाजारात कुठपर्यंत उपलब्ध राहतील. एखादे गॅजेट्स, कार किंवा अन्य सामग्री खरेदी करण्यासाठी ४५ दिवसांच्या आत अपडेट व्हर्जन बाजारात येते. अनेकदा उत्पादन निर्मिती बंद होते. उत्पादन ई-कचरा होते. २०१८-१९ मध्ये जवळपास ७.७ लाख टन ई-वेस्टची निर्मिती झाली होती. ही २०१९-२० मध्ये वाढून १०.१४ लाख झाली. एका वर्षात ई-वेस्ट ३१% पर्यंत वाढले. लोकल सर्कलच्या सर्व्हेत अशा रंजक बाबी समोर आल्या.
राइट टू रिपेअर पॉलिसी हवी : ई-वेस्ट नियमांसोबत सरकारने राइट टू रिपेअर धोरण लागू केले पाहिजे. जुलै २०२२ मध्ये घोषणा झाली,यामुळे ग्राहक व सेवा प्रदात्यांकडे सॉफ्टवेअर व हार्डवेअरची दुरुस्ती व देखभालीची माहिती सहज मिळेल.
ग्राहकांचे मत : पाच वर्षांपर्यंत पूर्ण सेवा गरजेची 47% म्हणाले, महागड्या घरगुती उत्पादनांना ब्रँड स्पेअर पार्ट्स,अॅक्सेसरीज सपोर्ट देत नाही. 77% ना वाटते, कमीत कमी ५ वर्षांपर्यंत सुट्या भागाची सेवा मिळावी. 54% च्या मते, उत्पादन निर्मितीनंतर ७ वर्षांपर्यंत एंड ऑफ लाइफ सर्व्हिस डेट द्यावी. 3% म्हणाले, त्यांना १० किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस सेवा प्राप्त करण्यात अडचण आली. 6% ग्राहकांना ६ ते ९ वेळा या समस्येचा सामना करावा लागला. 67% पुरुष व ३३% महिलांनी ३०९ शहरांत झालेल्या सर्कल सर्व्हेत भाग घेतला.
{बेस्ट बिफोर डेट वा एक्सपायरी डेटच्या धर्तीवर खाद्य पदार्थ, औषध व अन्य उत्पादनांच्या धर्तीवर एक्सपायरी डेटप्रमाणे एंड ऑफ लाइफ सर्व्हिस डेट नोंदवली पाहिजे. यामुळे ग्राहक उत्पादनबाबत निर्णय घेण्यास सक्षम ठरेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.