आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 83% Of People In The Country Take Out Health Insurance, 57% Want To Buy A Car, Citizens Over 60 Are Taking Lessons Of Digital Payment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅकेन्झी कंपनीचा सर्व्हे:देशातील 83% लोकांनी काढला आरोग्य विमा, 57% कार घेण्यास इच्छुक, 60 वर्षांवरील नागरिक डिजिटल पेमेंटचे घेत आहेत धडे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना विषाणूच्या काळात भारतीय ग्राहकांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची वाढते आहे शक्यता
  • मॅकेन्झीचा रिपोर्ट : ५७% लोक मानतात एका वर्षात आयुष्य पूर्वीप्रमाणे होईल, ८०% प्रकृतीबाबत सतर्क

कोरोना विषाणूच्या काळात जगात भारत व चीनच्या ग्राहकांच्या विचारात फरक आहे. येथील जनता घरातील खर्चात वाढ करते आहे.मॅकेन्झी, कॅपजेमिनी यासारख्या अनेक मोठ्या संस्थानी नुकत्याच केलेल्या सर्व्हेत हा पॅटर्न दिसून येतो. मॅकेन्झी अँड कंपनीच्या कोविड -१९ कन्झ्युमर सेंटिंमेंट पल्स सर्व्हेनुसार अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याबाबत लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कॅपजेमिनीच्या एका सर्व्हेनुसार, देशात खरेदी करण्याचाही पॅटर्न बदलला आहे. सर्व्हेनुसार, भारतात ५६ ते ६० वर्षे वयाच्या ८०% लोकांनी डिजिटल पेमेंट करण्याचे धडे घेत असल्याबद्दल सांगितले. तर जागतिक सरासरी ३५ % आहे. सर्व्हेत सहभागी झालेले ८३% लोक पुढील सहा महिन्यात आरोग्य व जीवन विमा पॉलिसी काढण्याचा विचार करत आहेत. मॅकेन्झीच्या सर्व्हेनुसार, ८५% लोकांनी कुटुुंबीयांची व स्वत:ची प्रकृती सांभाळण्याची चिंता असल्याचे सांगितले. या सर्व्हेत तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याचे दिसून आले. ४०% लोकांनी आधी पेक्षा जास्त ऑनलाइन स्ट्रीमिंग केलेले दिसले. २५% लोकांनी अाधीपेक्षा जास्त प्रोफेशनल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केल्याचे सांगितले. तर १४% लोकांनी रिमोट लर्निंग प्रक्रिया सुरू केल्याचे म्हटले.

कॅपजेमिनी सर्व्हे : संसर्ग टाळण्यासाठी स्वत:ची कार घेण्याची इच्छा

कॅपजेमिनी संशोधन संस्थेने नुकताच ११ देशाचा सर्व्हे केला. या देशात जगातील ६२% कार विकल्या जातात. सर्व्हेत सहभागी झालेल्या ५७% भारतीयांनी यावर्षी कार घेणार असल्याचे सांगितले. याबाबतीत चीनच्याही पुढे भारत आहे. येथे ६१% लोकांना कार विकत घ्यायची आहे. यामागे प्रकृतीचे कारण आहे. टॅक्सी, मेट्रो यासारख्या वाहतुकीच्या साधनाच्या तुलनेत संसर्गापासून बचाव करण्यासाठी कार सुरक्षित व हायजेनिक आहे.

चीन व भारतात ६०% लोकांची घरखर्च वाढवण्याची योजना

वर्ल्ड इकॉनाॅमिक फोरमने ५ देशांतील ग्राहकांचा खर्च करण्याच्या व्यवहारावरून भारतीय जास्त आशावादी असल्याचे सांगितले. येथील लोक घरखर्च वाढवण्याचा विचार करत आहेत. भारतात अशा विचारसरणीचे ६०% लोक आहेत. चीन, इंडोनेशिया व नायजेरियामध्ये असाच ट्रेंड आहे. अमेरिका व ब्रिटनमध्ये आकडेवारी ४० % पेक्षाही कमी आहे. व्हीएमअारच्या सर्व्हेनुसार भारतीयांचे एफएमसीजी व इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टला प्राधान्य .

92% लोकांनी म्हटले, आर्थिक स्थिती एका वर्षात आधीप्रमाणे होईल

सर्व्हेत सहभागी ९१% लाेकांनी वैयक्तिक व देशातील आर्थिक स्थिती एका वर्षात पुन्हा आधीप्रमाणे होईल, असे म्हटले. या सर्व्हेत दोन महिन्यांपूर्वी ८७% लोकांनी हेच सांगितले होते. म्हणजे लोकांत विश्वास वाढला आहे. तथापि ५४% लोकांनी उत्पन्न घटल्याचे सांगितले

बातम्या आणखी आहेत...