आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 85 year old Hindu Man From Kerala Builds Mosque, Church temple With Money From Christian Brothers

दिव्य मराठी विशेष:केरळच्या 85 वर्षीय हिंदू व्यक्तीने ख्रिस्ती बांधवांकडून पैसे घेऊन मशिदीचे केले बांधकाम, चर्च-मंदिरही बांधणार

तिरुवनंतपुरमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गाेपालकृष्णन सामुदायिक सद्भावाचे आदर्श, वास्तुकलेची आवड जोपासली

केरळची राजधानी तिरुवनंतपुरमचे गाेपालकृष्णन (८५) सामाजिक सद्भावनेचा आदर्श ठरले आहेत. त्यांच्या कार्यालयातील टेबलवर श्रीमद् भगवदगीता, कुराण, बायबल एकत्रित दिसून येतात. धार्मिक, एेतिहासिक इमारतींच्या वास्तुकलेची गाेपालकृष्णन यांना लहानपणापासून आवड होती. त्यातूनच त्यांनी केरळमध्ये अनेक धार्मिक वास्तू उभारल्या. त्यात १११ मशिदी, ४ चर्च आणि एक मंदिर यांचा समावेश आहे. सर्वाधिक आकर्षण पलायम जुमा मशिदीचे आहे. त्याच्या बांधकामासाठी एका ख्रिश्चन व्यक्तीकडून निधी उभारला हाेता. ही मशिदीला पाहण्यासाठी जगभरातून लाेक येतात. एका हिंदू व्यक्तीने कशा प्रकारे मशीद उभारली? हे पाहण्याची त्यांना उत्सुकता आहे.

१९६२ मध्ये उन्हाळ्याचे दिवस हाेते. वडील गाेविंदन ठेकेदार हाेते. त्यांना पलायम जुमा मशिदीच्या फेरबांधकामाचे कंत्राट मिळाले हाेते. मी बांधकामामध्ये वडिलांसाेबत असे. मी पैशांसाठी तत्कालीन एजी कार्यालयाचे अधिकारी पीपी चुम्मर यांच्याशी चर्चा केली हाेते. त्यांनी मला ५ हजार रुपये उपलब्ध करून दिले. चुम्मर यांना हे कार्य करताना खूप आनंद हाेत हाेता. मशिदीच्या बांधकामादरम्यान कर्ज देण्याचीही याेजना तयार हाेती. अशा प्रकारे एका हिंदू कुटुंबाने एका ख्रिश्चन व्यक्तीच्या पैशांचा वापर मशिदीच्या उभारणीत केला. ही मशीद पाच वर्षांत बांधून पूर्ण झाली. मशिदीचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती झाकीर हुसैन यांनी केले होते.

६० मशिदी बनवल्याने पाद्रीने चर्चचा प्रकल्प साेपवला
गाेपालकृष्णन म्हणाले, ६० मशिदी उभारल्या. असेच एकदा त्यावर चर्च का बनवत नाही, असा प्रश्न मित्रांनी विचारला. त्यावर लाेकांनी मला तसे काम दिल्यानंतर मी धार्मिक काम करताे. त्यानंतर एक पाद्री व काही लाेक माझ्या कार्यालयात भेटण्यासाठी आले. त्यांनी मला जाॅर्ज आॅर्थाेडाॅक्स चर्च बनवण्याचा आग्रह केला. मी त्या प्रकल्पाचे काम पूर्ण केले. अशा प्रकारे बंधुभावाचा विचार अधिक बळकट हाेत गेला, अशी भावना गोपालकृष्णन यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...