आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Election 2021
  • 85 Years Old Woman । West Bengal Elections । West Bengal Live Updates । Shova Majumdar Died । BJP Alleged Trinamool । Beating An Old Age Woman

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू:अमित शहा म्हणाले- या दुर्दैवी घटनेचा त्रास दीदींना अनेक दिवस होणार

कोलकाता19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेरेक ओब्रायन म्हणाले- आरोप करण्यापूर्वी तपास पूर्ण होण्याचा वाट पाहा

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना जिल्ह्यात भाजप कार्यकर्ता गोपाल मजूमदार यांच्या 85 वर्षीय आई शोवा मजूमदार यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्या मागील एका महिन्यापासून रुग्णालयात भरती होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर भाजप आणि तृणमूलदरम्यान आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. त्यांच्या मृत्यूमागे भाजप तृणमूलला जबाबदार ठरवत असून, तृणमूल भाजपवर मृत्यूचे राजकारण करत असल्याचा आरोप करत आहेत.

अमित शहा म्हणाले- बंगालच्या मुलीच्या मृत्यूने दुःखी

गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर म्हटले की, बंगालच्या मुलीच्या मृत्यूमुळे दुःखी आहे. तृणमूलच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली होती. मजूमदार कुटुंबाच्या या जखमेचा त्रास ममता दीदींना अनेक दिवस त्रास देणार. आमच्या माता-भगिणींना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी बंगाल हिंसामुक्त भविष्यासाटी लढेल.

डेरेक ओब्रायन म्हणाले- आरोप करण्यापूर्वी तपास पूर्ण होण्याचा वाट पाहा

तृणमूलचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी शोवा मजूमदार यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी नरेटिव्ह होण्याची गरज नाही. शहा अनेक सेंट्रल एजंसियचे हेड आहेत. त्यांनी तपासावर विश्वास ठेवावा.

हा फोटो 28 फेब्रुवारीला शोवा मजूमदार यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतरचा आहे.

बातम्या आणखी आहेत...