आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 87 Killed In Three Days Due To Toxic Liquor In Punjab , CM Orders Judicial Inquiry

पंजाब:विषारी दारू पिल्यामुळे तीन दिवसात 87 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले न्यायालयीन चौकशीचे आदेश

अमृतसर3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विषारी दारू पिल्यामुळे पंजाबमध्ये तिसऱ्या दिवशी 48 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यात तीन दिवसात 87 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी तरनतारनमध्ये सर्वात जास्त 44, अमृतसरमध्ये एक आणि बटालामध्ये तिघांचा मृत्यू झाला. पंजाब राज्यात विषारी दारुमुळे मरणाऱ्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

सरकारने सांगितल्यानुसार, ‘तरनतारनमध्ये आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2-2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. स्वतः सीएम अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे मोठे अपयश म्हटले आहे.