आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदाबाद:बॉयलरचा ब्लास्ट होऊन कापड गोदामाची छत कोसळली; 9 कामगारांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबादमध्ये बुधवारी(दि.4) केमिकल फॅक्टरीमध्ये आग लागून स्फोट झाल्यामुळे जवळ असलेल्या कापड गोदामाची छत कोसळली. यानंतर आग संपूर्ण गोदामात पसरली. या गोदामात 24 कामगार होते, यातील 9 जणांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू, केमिकल फॅक्टरीत 5 ब्लास्ट

दुर्घटना नानूभाई एस्टेटमधील केमिकल फॅक्टरीत घडली. तिथे बॉयलर फुटल्याने आग भडकली आणि एका पाठोपाठ एक 5 ब्लास्ट झाले. यानंतर केमिकल फॅक्टरीजवळ असलेल्या कापड गोदामाची छत कोसळली आणि यात काम करणारे कामगार ढिगाऱ्याकाळी अडकले. यात 9 जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे. गोदामाची आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या 24 गाड्या बोलवण्यात आल्या होत्या.