आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 9 Decades Old Tradition In 900 Villages In Kashmir; People Donate To Help The Patient, And Also Bear The Expenses Of The Deceased's Family

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामाजिक परिवर्तन:काश्मिरातील 900 गावांत पाच दशके जुनी परंपरा; रुग्णाला मदतीसाठी लोक दान देतात, मृताच्या कुटुंबीयांचा खर्चही उचलतात

श्रीनगर/बडगामहून अमितकुमार निरंजन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णावर उपचारासाठी लोक पैसे जमवतात, पोलिसही करतात मदत
  • लॉकडाऊनमध्ये ४ पट वाढल्या मोहल्ला समित्या, सर्वात आधी गरजू यांचीच भेट घेतात

जम्मू-काश्मीरच्या धार्मिक संस्थांमध्ये जमा होणाऱ्या निधीकडे आतापर्यंत संशयाने बघितले जात आहे. मात्र, दहशतवादाला सुरुवात होण्यापूर्वी या संस्थांमध्ये रुग्णांवर उपचारासाठी आर्थिक मदत देण्याची परंपरा चालत आली आहे. खोऱ्यातील ९०० पेक्षा जास्त गावांमध्ये रुग्णांसाठी पैसे जमवले जातात. येथे डेथ कमिट्याही बनवण्यात आल्या आहेत, या कमिट्या ज्या घरात एखाद्याचा मृत्यू झाला असेल त्या घराच्या चार दिवसांच्या खर्चाची जबाबदारी घेतात. या चांगल्या कामात अनेकदा स्थानिक पोलिसही मदत करतात. जोकू खारियन गावाचे माजी सरपंच आणि मौलवी मोहंमद मकबूल यांनी सांगितले की, रुग्णाच्या मदतीसाठी कुरआन शरीफ आणि मुस्लिम शरीफमध्ये सांगण्यात आले आहे. यामुळे आमच्याकडे आधी हे काम मशिदीद्वारे केले जायचे. व्यक्ती उत्पन्नातील काही भाग प्रत्येक शुक्रवारी देऊन जायची. मात्र दहशतवादादरम्यान काही मशिदींमध्ये या निधी गोळा करण्यावर प्रशासनाने हरकत घेतली. यामुळे लोकांनी स्वत: मदत करणे सुरू करत परंपरा चालू ठेवली. सर्व गावांत अाजही ते सुरू आहे. बडगामचे एसपी अमोद अशोक नागपुरे सांगतात की, रुग्णाच्या उपचारासाठी पैसे जमवण्याची ही परंपरा खूप जुनी आहे. मशीद आणि औकाफ समितीचे लोक मदत एकत्र करतात. डेथ कमिटीदेखील चांगले काम करत आहेत. मृताच्या अंत्यसंस्काराच्या साहित्यापासून कुटुंबाच्या खाण्यापिण्याचा खर्चही याच कमिटी करतात. सरपंच किंवा एखाद्याच्या सूचनेवरून आम्हीही रुग्णवाहिकेसह इतर व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो. साहित्यिक जरीफ अहमद जरीफ सांगतात की, ५ दशकांपासून मदतीची ही पद्धत पिढ्यान््पिढ्या सुरू आहे. आता गावाचा सरपंच किंवा वयस्कर व्यक्तीद्वारे रुग्णाचे कुटुंब मदत मागते आणि बाकीचे त्याच्या उपचारासाठी आर्थिक सहकार्य करतात. मदतीची ही परंपरा आता शहरांत पोहोचली आहे. मात्र पद्धत बदलली आहे. शहरातील गल्ल्यांमध्ये लहान लहान समित्या आहेत. यात गल्लीतील लोकच गरजूची मदत करतात. लॉकडाऊनमध्ये तर अशा समित्या चार पट वाढल्या. श्रीनगरमध्येच यांची संख्या ५० पेक्षा जास्त झाली आहे.

काही दिवसांत जमतात लाखो रुपये

जाेकू खारियन गावाचे इरशाद अहमद यांच्या कर्करोगावर उपचारासाठी गावकऱ्यांनी दोन दिवसांत पाच लाख रुपये, तर लारकीपुरातील कर्करोगग्रस्त इम्रानसाठी ८ लाख रुपये जमवले. याच प्रकारे संगलीपुराचे गुलाम मलिक यांच्या उपचारासाठी सहा दिवसांत ४ लाख रुपये गोळा करण्यात आले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser