आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजीवन विस्कळीत:आसाममध्ये पुराचा कहर; 9 जणांचा मृत्यू, एकूण आकडा 55 वर, 19 लाखांहून जास्त लोकांना पुराचा तडाखा

गुवाहाटी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाममध्ये पुराने कहर केला आहे. पुरामुळे शनिवारी आणखी ९ जणांचा मृत्यू झाला. याबरोबरच पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५५ झाली आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांतील १९ लाखांहून जास्त लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. एक लाखाहून जास्त लोकांना घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. त्यातच होजई जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांना घेऊन जाणारी नौका उलटली. त्यात तीन मुले बेपत्ता झाली.

२१ जणांना वाचवण्यात यश मिळाले. २४ गावकरी शुक्रवारी उशिरा रात्री इस्लामपूर गावातून बोटीने सुरक्षित ठिकाणाच्या दिशेने जात होते. रायकोटा भागात त्यांची नौका उलटली. पाण्यात बुडालेल्या एका वीटभट्टीला टक्कर झाल्याने ही घटना घडली. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे २ हजारांहून जास्त नागरिक विस्थापित झाले. त्यांनी २० छावण्यांत आश्रय घेतला आहे.

बांगलादेशात एक तृतीयांश भागात पूर, २५ मृत्यू
बांगलादेशात पुरामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. देशातील एक तृतीयांश क्षेत्रात पुराने कहर केला आहे. विविध शहरांतील ४० लाखांहून जास्त नागरिक अडकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...