आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थान:गरोदर महिलेला 6 दिवसांत 196 किमी चालल्यानंतर मिळाला दिलासा

डूंगरपूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • अहमदाबादहून मध्य प्रदेशातील रतलामला जाण्यासाठी पायीच निघाले होते

अखिलेश पण्ड्या 

कोरोनाच्या या प्रकोपात आपण घरी सुरक्षित आहोत. मात्र जे घरापासून दूर आहेत, त्यांना घरी जाण्यासाठी अनेक अडचणी आहेत. हेच चित्र डुंगरपूरमधील टामटिया गावात बघायला मिळाले. ९ महिन्यांच्या गरोदर महिलेला काही पावले चालणेही कठीण असते. मात्र या ९ महिन्यांच्या गरोदर महिलेने ६ दिवसांत १९६ किमीचे प्रवास केला. सोबत पती आणि दोन मुलेही होते. ही महिला अनेक पोलिस चौक्या प्रशासनाच्या लोकांसमोरून गेली, मात्र कोणीही मदत केली नाही. 

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील सैलाना या तालुक्यामधील कुपडा गावाची रहिवासी लक्ष्मण भाबर, सोबत ९ महिन्यांची गरोदर पत्नी बापुडी, २ वर्षांची मुलगी आणि एक वर्षांचा मुलगा अहमदाबादहून ६ दिवसांपूर्वी पायीच निघाले होते. ते रतनपूर सीमेवरून डुंगरपूर मार्गे टामटिया चेक पोस्टजवळ पोहोचले. येथे तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पोटभर जेवण दिले. रुग्णवाहिकेची सोय करून घरी पोहोचवण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...