आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेराेनामुळे ही अवस्था:चेन्नईत 90 दिवसांची विशेष पाहणी, राजस्थानात 500 हून जास्त रुग्ण

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दररोज सुमारे 3 लाख घरांत जाऊन आरोग्य कर्मचारी करू लागले चौकशी

तमिळनाडूत कोरोना संसर्ग वाढला आहे. त्यामुळेच ग्रेटर चेन्नई महापालिकेने ९० दिवसांची विशेष पाहणी मोहिम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत १२ हजार ५०० आरोग्य कर्मचारी सुमारे १८.५ लाख घरांत जाऊन पाहणी करू लागले आहेेत. या पाहणीत ज्वराने पीडित लाेकांची आेळख पटावी, असा त्यामागे महापालिकेचा उद्देश आहे. त्याच्या मदतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होऊ शकेल. आयुक्त जी. प्रकाश म्हणाले, ७५-१०० घरांसाठी १२ हजार क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक क्लस्टरची पाहणी आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे केली जात आहे. प्रत्येक वॉर्डात एक मेडिकल टीम नियुक्त करण्यात आली आहे. पाच दिवसांत १५ लाख लाेकांची चौकशी झाली आहे.       

गुजरात : एका व्यक्तीमुळे ३० जणांना बाधा 

अहमदाबादमध्ये २४ तासांत कोरोनाचे ५८ लोक पॉझिटिव्ह आढळून आले. एका व्यक्तीमुळे ३० जणांना बाधा झाली. परंतु या तीस जणांमध्ये कोरोनाचे कोणतीही लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यांचा तपासणी अहवाला पॉझिटिव्ह आला. 

राजस्थानमध्ये ३३ पैकी २४ जिल्ह्यांत संसर्ग

राजस्थानमध्ये कोरोना संसर्गाचा आकडा वाढू लागला आहे. संपूर्ण मार्चमध्ये ९३ रुग्ण समोर आले होते. गेल्या १० दिवसांत राजस्थानात ३३ पैकी २४ जिल्ह्यांत संसर्ग वाढला आहे. 

बातम्या आणखी आहेत...