आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 93% Of People Depend On Family In Difficult Times, 43% Of People Say, Now The Respect In The Relationship Has Decreased

कुटूंब दिन:93 % लोक कठीण काळात कुटुंबावर अवलंबून असतात, 43 % लोक म्हणतात, आता नात्यातील आदर झाला कमी

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या सर्वेक्षणात अनेक रंजक बाबी समोर आल्या. संकटातील सर्वात मोठ्या मित्राप्रमाणे, न बोलता मनाला समजून घेणारी आणि चुकूनही रक्षण करणारी ‘आई’असते. तर आदर्श आणि ज्याचा सल्ला नेहमी उपयोगी पडतो तो ‘पिता’असतो. मनातील सर्व काही सांगता येईल, या मुद्द्यावर आई व नंतर बहिणीचे स्थान आहे. त्याचप्रमाणे, सर्वेक्षणात ८१ टक्के लोकांनी सांगितले की, नोकरदार महिलांना घरातील कामात पुरुष सदस्यांची मदत मिळते. मात्र, २४ टक्के महिला या मताशी सहमत नाहीत. ९३ टक्के लोकांना प्रत्येक संकटाच्या वेळी कुटुंब त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येते. सुमारे ७५ टक्के लोक वृद्धांना कुटुंबाचा केंद्रबिंदू मानतात. सर्वेक्षणात वैचारिक मतभेद आणि परस्पर सामंजस्याचा अभाव ही संयुक्त कुटुंबे कमी होण्याची दोन प्रमुख कारणे समोर आली आहेत. सर्वेक्षणानुसार, आजही लोकांना सगळे एकत्र जेवणे, कुटुंबासोबत बसून टीव्ही पाहणे आवडते. भावनांना मोकळी वाटही करून दिली जाते, ही कुटुंबाची सर्वात मोठी ताकद असल्याचे ते मानतात.

मुळे कुटुंब मजबूत
1. कुटुंब नेहमी सहकार्य करते. ते योग्य निर्णयात मदत करते आणि चुकीचा निर्णय घेतला तरी माफ करते.
2. लोक करिअरमध्ये प्रगती करण्याच्या तुलनेत कुटुंबाला जास्त महत्त्व देतात.
3. आपल्या सर्वात कठीण काळात लोक कुटुंबावरच जास्त विश्वास ठेवतात, त्याच्याकडूनच मदतीची अपेक्षा करतात.
4. सोबत टीव्ही पाहणे, सोबत जेवण करणे, रोज रात्री काही काळ सोबत व्यतीत करण्यास आजही प्राधान्य आहे.
5. लोक ज्येष्ठ व्यक्तींना कुटुंबाला जोडून ठेवण्याचे माध्यम मानतात.
6. कोणत्या स्थितीत कुटुंबाने सर्वाधिक साथ दिली?
चुका माफ करणे आणि योग्य मार्ग दाखवण्यात आघाडी
सर्वेक्षणात ३७ टक्के लोकांनी सांगितले की, कुटुंब त्यांना प्रत्येक परिस्थितीत साथ देते. सर्वाधिक ३९.४ टक्के लोकांनी सांगितले की, जेव्हा
त्यांच्याकडून चूक झाली तेव्हा कुटुंबाने त्यांची काळजी घेतली, चूक माफ करून योग्य मार्ग दाखवला.

प्रत्येक परिस्थितीत साथ देणारे कुटुंब
35% लोक म्हणाले, जेव्हा मी माझ्या आवडीचे करिअर निवडले तेव्हा घरच्यांनी मला साथ दिली.
10.3% म्हणाले, जेव्हा मी आवडीचा जीवनसाथी निवडला तेव्हा कुटुंबाने निर्णयाचा आदर केला.

7. कोणत्या कौटुंबिक समस्यांमुळे सामाजिक अंतर वाढत आहे?
अंतर वाढण्याचे मोठे कारण : मोबाइलचा अधिक वापर
१८ ते ४५ वयोगटातील ४५% तरुणांनीही मोबाइल हे कुटुंबातील अंतराचे कारण मानले. ५१.४% महिलांचे असेच मत आहे.
43.9% लोकांचे मत आहे की, परिवातील सदस्य मोबाइलसाठी जास्त वेळ देतात.
13.2% नी सांगितले की आजींच्या कथांची जागा हिंसक खेळांनी घेतल्याने मुले चिडकी झाली.
42.9% जणांनी मान्य केले की पूर्वीच्या तुलनेत आता नातेसंबंधातील आदर कमी झाला.

8. कुटुंबाला करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळाली आहे?
60% महिला आणि 56% पुरुषांनी सोडल्या अशा संधी
कुटुंबासाठी करिअर आणि आयुष्यात पुढे जाण्याच्या संधी सोडणाऱ्या पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. ६०.५% महिलांनी असे केले
असल्याचे सांगितले. तर ५६% पुरुषांनी कुटुंबासाठी करिअरच्या संधी सोडल्या आहेत.

एकूण ५७ टक्के लोकांनी संधी नाकारली
42.8% लोक म्हणाले की परिवारासाठी त्यांनी करिअर मध्ये मिळालेली संधी नाही साेडली
57.2% लोक म्हणाले की त्यांनी कुटुंबासाठी साेडली आहे करिअरची संधी

9. सर्वात कठीण काळात कुणावर अवलंबून राहता?
कुटुंब सर्वात आधी, त्यानंतर मित्र-परिचितांचा समावेश
कठीण काळात कुटुंबाच्या सहकार्याबद्दल कुणाचेच दुमत नाही. ९५ टक्के महिलांचेही म्हणणे आहे की, कठीण काळात कुटुंबच आपला प्रमुख
आधार बनत असते.
93% नी सांगितले की, आपल्या सर्वात कठीण काळात ते कुटुंबावर अवलंबून राहतात.
2.3% लोकांनी म्हटले, की परिचितांवर अवलंबून राहतो.
4.7% लोक म्हणाले की ते मित्रांवर अवलंबून असतात.

10. एकत्र कुटुंब पद्धती घटण्याची कारणे काय..?
सामंजस्याचा अभाव आणि वैचारिक मतभेद हे मोठे कारण
५१.७ टक्के लोक संयुक्त कुटुंब घटण्याची दोन मोठी कारणे असल्याचे सांगतात. पहिले, कुटुंबातील सदस्यांत वैचारिक मतभेद असणे आणि
दुसरे म्हणजे सामंजस्याचा अभाव.
नोकरी सर्वात मोठे कारण नाही
12.5% लोकांनी म्हटले, मुले वेगळी राहू इच्छितात.
13.6% संपत्तीशी निगडित वाद संयुक्त कुटुंब घटण्याचे प्रमुख कारण मानतात.
22.8% नी सांगितले की, कुटुंबातील सामंजस्य घटले.
22.2% म्हणाले की, नोकरीमुळे वेगळ्या शहरात राहणे हे महत्त्वाचे कारण.
28.9% मानतात की कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद हे प्रमुख कारण.

11. कुटुंबातील नातेसंबंधांवर निगडित प्रश्न, लोकांची उत्तरे
80% कुटुंबांत रोज एकवेळचे जेवण सर्वजण एकत्र करतात

13. काम करणाऱ्या महिलांना घरातील कामात पुरुषांची मदत मिळते का? २४ टक्के महिलांचे म्हणणे : मदत नाही घरकामात पुरुषांची मदत मिळते असे ७६ टक्के महिला आणि ८५ टक्के पुरुषांचे म्हणणे आहे. महिला आणि पुरुषांच्या मतांची बेरीज केली तर असे दिसून येते की, ८१ .८ टक्के पुरुष कामात मदत करतात.

14. सदस्याला वैशिष्ट्यांच्या आधारावर निवडा आईकडून चुकांवर पांघरूण, तर वडील आहेत रोल मॉडेल

संकटकाळी हेच लोक कामात येतात?
संकटाच्या वेळी आईच धावून येते असे 66% लोक म्हणतात, 62.4% लोकांनी वडिलांना निवडले.
जो न सांगता मनातील ओळखतो?
75.7% लोकांनी आईची निवड केली तर 29% म्हणतात की वडील न सांगता मनातील ओळखतात.
कुणाला मनातील सर्व गोष्टी सांगू शकतो?
आईला मनातील सर्वच गोष्टी सांगू शकतो असे 56% लोकांचे म्हणणे आहे. 26.8%, बहिणीला, 25.9% भावाला तर 20.1% लोकांचे
वडिलांना मनातील गोष्टी सांगू शकतो असे म्हणणे आहे.

कठोरही आहेत आणि प्रेमळही?
वडील दोन्हीही असतात असे 63.3% लोकांचे म्हणतात.
चुका केल्या तरी त्यावर पांघरूण घालणारे?
63% मत, आईच चुकांवर जास्त पांघरूण घालते.
ज्याचा सल्ला नेहमीच तुमच्या कामी येतो?
58% लोकांच्या मते वडिलांचा सल्ला नेहमी कामी येतो.
तुमच्या गुपितांना पोटात ठेवते?
40% लोकांच्या मत आईच गुुपित पोटात ठेवते.
जो तुमच्यासाठी रोल मॉडेल आहे?
56.3% लोकांसाठी वडील, तर 52% लोकांसाठी आई.

बातम्या आणखी आहेत...