आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 94 Crore Population In 10 States, But Only 11,000 Patients Daily; So, In Maharashtra With A Population Of 12 Crore, 36,000 Patients Every Day Corona News And Updates

कोराना महामारी:94 कोटी लोकसंख्या 10 राज्यांत, तरी रोज फक्त 11,000 रुग्ण; तर, 12 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात रोज 36 हजार रुग्ण

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात कोरोनाचा नवा उच्चांक जग पाहत आहे, परंतु सत्य हे आहे की हा संसर्ग संपूर्ण देशात नाही; फक्त महाराष्ट्रातच नवा ‘पीक’ आहे

देशात दुसऱ्या कोरोना लाटेची जोरदार चर्चा आहे. परंतु, ती केवळ महाराष्ट्रापुरतीच. येथेच रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २४ मार्चला येथे सुमारे ३२ हजार नवे रुग्ण आढळले. या तुलनेत सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या १० राज्यांत एकूण ११ हजार रुग्ण आढळताहेत. १ मार्चपासून आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरी १७,८३८ रुग्ण आढळत असून गेल्या दोन आठवड्यांत ही संख्या ३० हजारांवर गेली आहे. दुसरीकडे, या दरम्यान १० मोठ्या राज्यांत एकूण सरासरी ५४२० नवे रुग्ण आढळत आहेत.

मोठ्या लोकसंख्येच्या राज्यात कर्नाटकचाही समावेश आहे. येथे रोज सरासरी १०००हून अधिक रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्राहून सुमारे दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात रोज सरासरी ३१० रुग्ण आढळताहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे तेथे कोरोनाचे तिन्ही स्ट्रेन सापडले आहेत. यात यूके स्ट्रेनचे ५६, द. आफ्रिकी स्ट्रेनचे ५ आणि ब्राझील स्ट्रेनचा एक रुग्ण आहे. नवा डबल म्युटंट प्रकारही येथे सापडला आहे.

स्टेट बँकेचा रिपोर्ट : दुसरी लाट राहू शकते १०० दिवस, १५ एप्रिलनंतर येईल रुग्णांचा ‘पीक’
स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी जाहीर केलेल्या एका अहवालात दावा केला आहे की, भारतात फेब्रुवारीपासून कोविड-१९चे नवे रुग्ण वेगाने वाढत आहेत. हा कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा स्पष्ट इशारा आहे. ही वाढ १५ फेब्रुवारीपासून सुरू झाली असे गृहित धरले तर दुसरी लाट किमान १०० दिवस राहू शकते.

पहिल्या लाटेदरम्यानचा अनुभव पाहता या वेळी एप्रिलच्या मध्यापर्यंत नवे रुग्णांचा उच्चांक होऊ शकतो. तर, २३ मार्चला आढळलेल्या नव्या रुग्णांच्या आधारे दुसऱ्या लाटेत एकूण २५ लाख रुग्ण आढळतील. विविध जिल्ह्यांत लागू केले जात असलेले लॉकडाऊनही कोरोना रुग्ण कमी करण्याच्या कामी कुचकामी ठरत असल्याचे २८ पानी अहवालात नमूद आहे. जास्तीत जास्त लसीकरण हीच आता आशा आहे. या लॉकडाऊनचा व्यवसायावरील परिणाम पुढील महिन्यांत दिसू शकतो.

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले की, देशात २४ तासांत ५३,४७६ रुग्ण आढळले. २५१ मृत्यू झाले. बंगळुरूला जाण्यासाठी आरटीपीसीआर आवश्यक.
  • महाराष्ट्र व गुजरातमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत १४ महिन्यांत एक दिवसांतील सर्वात मोठी वाढ. मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून ४ कोटींची वसुली.

सहा राज्यांत देशातील 81% नवे रुग्ण
महाराष्ट्र: 59.56%
पंजाब: 4.88%
केरळ: 4.59%
कर्नाटक: 4.29%
छत्तीसगड: 3.93%
गुजरात: 3.34%

बातम्या आणखी आहेत...