आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6 लाख 64 हजार 764 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. शनिवारी बंगळुरूच्या आयुक्तांनी रस्त्यावर रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत प्राण गमावलेल्या कोरोना रूग्णाच्या कुटूंबाची भेट घेत माफी मागितली.
मृतकाच्या पत्नीने सांगितले की, तिच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मागील काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांनी रुग्णवाहिकेसाठी रुग्णालयात फोन केला. दोन तास वाट पाहिल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही, म्हणून ती रस्त्याकिनारी आपल्या पतीसोबत वाट पाहत होती. परंतु यादरम्यान कोणी ऑटोवाला देखील थांबला नाही. दरम्यान तिच्या पतीचा रस्त्याच्या कडेलाच मृत्यू झाला.
केंद्राने कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्या रेमडेसिविर औषधाच्या डोसमध्ये बदल केला
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी रीमाडेसिविर अँटी-व्हायरल औषधाच्या डोसमध्ये बदल केला आहे. याचे डोस रोगाचा हलक्या टप्प्यात पहिल्या सहा दिवसांऐवजी पाच दिवसांचा करण्यात आला आहे. मंत्रालयाने याचा नवीन क्लिनिकल प्रोटोकॉल जारी केला आहे.
नव्या नियमानुसार, इंजेक्शनच्या रुपात दिला जाणाऱ्या या औषधाचा पहिल्या दिवसाचा डोस 200 मिग्रा आणि नंतर दररोज चार दिवसांपर्यंत 100 मिग्रा (एकूण पाच दिवस) देण्यात यावी. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 13 जून रोजी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णास मर्यादित वापराखाली रेमडेसिविर देण्याची मंजुरी दिली होती.
देशात आतापर्यंत 95 लाखांपेक्षा जास्त टेस्ट
याच काळात इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने शनिवारी सांगितले की, देशात आतापर्यंत 95 लाख 40 हजार 132 पेक्षा जास्त टेस्ट झालेल्या आहेत. 3 जुलैला 2 लाख 42 हजार 383 टेस्ट करण्यात आल्या. तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशात आता 11 हजार 300 व्हेंटिलेटर तयार करण्यात आले आहेत. यामधील 6154 व्हेंटिलेटर रुग्णालयांना सोपवण्यात आले आहेत. तर पूर्ण देशामध्ये 1.02 लाख ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. ़
रिकव्हरी रेट 60% पेक्षा जास्त
देशात आता 3.38 लाख रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी रिकव्हरी रेट 60% च्या पार गेला आहे. आतापर्यंत देशात 60.73% रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 10 दिवसांमध्ये यामधील 4% वाढ झाली आहे. 24 जूनला रिकव्हरी रेट 56% होता.
covid19india.org नुसार शुक्रवारी विक्रमी 22 हजार 721 रुग्णांची नोंद झाली आणि 14 हजार 417 हून अधिक बरे झाले. यादरम्यान महाराष्ट्रात एका दिवसांत सर्वाधिक 6364 रुग्ण वाढले. दुसरीकडे तमिळनाडूत 4329 प्रकरणे समोर आली. यासोबत तमिळनाडूत 1 लाखांपेक्षा अधिक रुग्ण झाले. उत्तरप्रदेशातही एका दिवसात 972 संक्रमित आढळले. यासोबत येथील रुग्णांची संख्या 25 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.