आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 984 Important Projects In The Country Stalled Due To Corona; 10% Increase In Costs

नॉलेज रिपोर्ट:कोरोनामुळे रखडले देशातील 984 महत्त्वाचे प्रकल्प; खर्चात 10% वाढ, लॉकडाऊनचा पायाभूत क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम

नवी दिल्ली ( प्रमोदकुमार )2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील महत्त्वाच्या प्रकल्पांची सद्य:स्थिती काय आहे ते जाणून घ्या...

काेराना व्हायरसमुळे देशभरातल्या पायाभूत प्रकल्पांवर खूप प्रतिकूल परिणाम झाला आहे. काराेनामुळे पायाभूत प्रकल्पांना हाेणाऱ्या विलंबामुळे या क्षेत्राला ४.६ लाख काेटी रुपयांचा फटका बसला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री अँड लाॅजिस्टिक फेडरेशन आॅफ इंडियाचे महासंचालक डाॅ. महेाश वाय रेड्डी म्हणाले, आमच्या क्षेत्रामुळे सर्वात जास्त राेजगार उपलब्ध हाेताे. लाॅकडाऊनच्या आधी देशभरात १,७०१ माेेठ्या प्रकल्पांचे काम सुरू हाेते. यातील ९८४ प्रकल्प काेविडमुळे वेळेवर पूर्ण हाेऊ शकत नाहीत. त्याच्या खर्चातही वाढ झाली आहे. चीनमधील पाेलाद प्रकल्प सुरू हाेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आपण चीनला पाेलादाचा पुरवठा करत आहाेत. काेराेनामुळे असे पहिल्यांदाच घडत आहे. पाेलाद निर्यात केल्यामुळे ही महागाई झाली. परिणामी देशात प्रकल्प खर्चातही वाढ झाली. आॅल वेदर राेड उत्तराखंडचे नाेडल अधिकारी वीरेंद्रसिंह खेडा म्हणाले, काेविडमुळे देशभरातल्या प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. भूसंपादन करणारे कर्मचार-अधिकारी असाेत वा कुशल तंत्रज्ञ सर्वच काेराेनाच्या कामात जुंपले गेले आहेत. पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे.

देशातील महत्त्वाच्या प्रकल्पांची सद्य:स्थिती काय आहे ते जाणून घ्या...

भारतमाला प्रकल्प : काेराेनासह अन्य कारणांमुळे खर्चात ५४% वाढ

काय आहे प्रकल्प - १६ राज्यांना जाेडणाऱ्या ३५०० किमी लांबीचा महामार्ग बांधण्याच्या भारतमाला प्रकल्पात ९,००० आर्थिक काॅरिडाॅरची निर्मिती हाेणार आहे. रस्ते जाेडणीत सुधारणा, मालवाहतूक सुलभ करणे आणि २२ दशलक्ष राेजगार निर्मितीसाठी या प्रकल्पाद्वारे हाेणार.

दाेन महत्त्वाचे प्रकल्प : एकावर परिणाम, दुसऱ्यावर मात्र नाही

बुलेट ट्रेन- मुंबई-अहमदाबाददरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन ५०८ किमी वेगाने धावणार आहे. हा प्रकल्प २०२३ मध्ये पूर्ण हाेणार आहे. प्रकल्प कामावर परिणाम झाला असला तरी निविदांची कामे सुरू आहेत. गुजरातमधील गुजरात इंटरनॅशल फायनान्स टेक सिटी २०२३ मध्ये पूर्ण हाेणार हाेती. आता तीही रखडली.

मेट्रो रेल्वे प्रकल्प - ३७ शहरांत मेट्राे रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असून या मार्गांची लांबी ७९५ किमी आहे. लाॅकडाऊनमुळे जुजबी काम सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. भूसंपादनासारख्या मुद््द्यामुळे प्रकल्पाला अगाेदरच विलंब झाला आहे. आता आणखी विलंब हाेणार आहे.

केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार खात्याच्या संकेतस्थळानुसार 6088 एकूण प्रकल्प देशात सुरू आहेत

48,28,391.98 काेटी रुपये याचा खर्च

ऑल वेदर रोड : उन्हाळ्यात वेगाने काम, आता रखडले

काय आहे प्रकल्प : चारधाम यात्रा व चीन-नेपाळ सीमेपर्यंत सहजपणे पाेहोचता यावे यासाठी उत्तराखंडमध्ये आॅल वेदर राेड नावाने ७ रस्त्यांची उभारणी सुरू आहे. यामुळे चारधाम यात्रेचा मार्ग सुकर होईल. दरड काेसळण्याचा धाेका नसेल. या रस्त्यामुळे ६ महिने बंद राहणारे रस्ते पूर्ण वर्षासाठी खुले राहतील विलंब : ११,७०० काेटी रुपये खर्चाची ही याेजना २०२२ मध्ये पूर्ण हाेता, पण आता वर्षभरापेक्षा जास्त वेळ लागेल.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडाॅर : अधिग्रहण रखडले

काय आहे प्रकल्प : हा १०० अब्ज डाॅलरचा प्रकल्प आहे. मुंबई-दिल्ली जाेडणारा १,५०० किलाेमीटरचा ६ मार्गिकांचा मार्ग आहे. याच्या जवळ २४ स्मार्ट शहरे, २३ आैद्याेगिक केंद्रे, दाेन विद्युत प्रकल्प, ६ विमानतळे, दाेन बंदरे उभारली जातील.यामुळे दिल्लीच्या कारखान्यातील माल बंदरापर्यंत पाेहोचवण्याचा वेळ घटून १४ दिवसांवरून १४ तासांवर येईल. विलंब : २०१९ मध्ये पूर्ण हाेणार हाेता. आधीच विलंब झाला आहे.

सागरमाला प्रकल्प : एक काेटी राेजगार निर्मिती क्षमतेचा प्रकल्प रखडला

काय आहे प्रकल्प : देशातील ७५ हजार किमीचा सागरी किनारा, १२ प्रमुख बंदरे, १८५ लहान बंदरांबराेबरच पूर्ण परिसराचे आधुनिकीकरण करणाऱ्या प्रकल्पांवरही काेराेनाचा परिणाम झाला. या याेजनेमुळे जीडीपीत २ % वाढ व दरवर्षी अंदाजे ३५ हजार काेटींची व्यापारवृद्धी.

बातम्या आणखी आहेत...