आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांना वाचवण्यासाठी 14 वर्षीय मुलीची अस्वलाशी झुंज:8 मिनिटांच्या संघर्षानंतर अस्वलाला काठीने पळवले, आईनेही केली मदत

जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील एका मुलीने आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले. तिने जंगली अस्वलाच्या तावडीतून वडिलांची सुटका केली. सिरोहीच्या सिलदर गावात सोमवारी रात्री एका अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केला. हे पाहून कुत्र्यांनी एकच भुंकणे सुरू केले. या आवाजाने शेतकऱ्याची 14 वर्षीय कन्या जोशनाला जाग आली. अस्वलाने वडिलांना रक्तबंबाळ केल्याचे पाहून ती थेट त्याच्यावर चाल करून गेली. जवळपास 7-8 मिनिटांच्या संघर्षानंतर तिने अस्वलाला पळवून लावले.

वडिलांना वाचवणारी जोशना झाल्या प्रकाराने भेदरली आहे. पण तिने हिंमत दाखवली तर केवढ्याही मोठ्या संकटाचा सामना करता येतो हे तिने दाखवून दिले आहे.
वडिलांना वाचवणारी जोशना झाल्या प्रकाराने भेदरली आहे. पण तिने हिंमत दाखवली तर केवढ्याही मोठ्या संकटाचा सामना करता येतो हे तिने दाखवून दिले आहे.

अस्वलाने तिचे वडील करमा राम चौधरी (50) यांना गंभीर जखमी केले. अस्वलाने त्यांच्या तोंडाचा लचका तोडला. जखमी शेतकऱ्याला गुजरातच्या मेहसाणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर त्यांची कन्या जोशना व कुटुंबीय घाबरले आहे. जोशनाने सांगितले की, अस्वलाशी दोनहात करताना मनात काहीही झाले तरी वडिलांना वाचवण्याचा एकच निर्धार होता.

अस्वल वडिलांचे लचके तोडत होता, माझे पाय थरथर कापत होते

जोशना म्हणाली - 'मी माझ्या आई-वडिलांसोबत शेतात होते. रात्री वडील उघड्यावर झोपले. मी आईसोबत आत झोपले होते. मध्यरात्री 3 च्या सुमारास अचानक कुत्र्यांनी गोंधळ केल्याने माझी झोप उडाली. काही लक्षात येईपर्यंतच वडिलांचे ओरडणे ऐकू आले. मी व आईने त्यांच्याकडे धाव घेतली. तेथील चित्र पाहून आमची भीतीने गाळण उडाली.'

'अस्वलाने वडिलांना बाजेवरून खाली पाडले होते. त्यानंतर त्यांच्या छातीवर बसून त्यांचे लचके तोडत होता. प्रथम तर भीतीने माझे पाय थरथर कापत होते. पण वडिलांना वाचवण्याचा विचार येताच मी काठी घेऊन अस्वलाच्या दिशेने धावले व त्याच्यावर हल्ला सुरू केला. मनात एकच गोष्ट होती, काहीही झाले तरी वडिलांना वाचवायचे.'

जोशनाने अस्वलावर काठीने, तर तिच्या आईने दगडाने हल्ला केला
जोशनाने अस्वलावर काठीने, तर तिच्या आईने दगडाने हल्ला केला

'काठीने मारहाण केल्यामुळे अस्वल आणखीनच आक्रमक झाला. त्याने आमच्याकडे धाव घेतली. अंधारामुळे आम्हाला अस्वल बरोबर दिसत नव्हता. त्याने आमच्याकडे मोर्चा वळवल्यानंतर आईने त्याच्यावर दगड फेकले. त्यानंतर मीही हातात काठी घेऊन अस्वलाचा सामना सुरू केला. कदाचित अस्वलाने मला पकडले असते तर मी वाचले नसते. पण मला माझ्या वडिलांना वाचवायचे होते. त्यामुळे दुसरा कोणताही मार्ग नव्हता.

अस्वल माझ्यावर धावून येत होता. पण काठीचा फटका बसताच मागे हटत होता. 7-8 मिनिटांच्या संघर्षानंतर अस्वल तेथून पळून गेला. त्यानंतर मी माझ्या काकांना फोन केला. त्यानंतर त्यांनी शेतात येऊन वडिलांना जतवंतपुरा रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना गुजरातच्या मेहसाना रुग्णालयात हलवण्यात आले.

जखमी शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्रीनंतर 2 च्या सुमारास ही घटना घडल्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले नाही.
जखमी शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्रीनंतर 2 च्या सुमारास ही घटना घडल्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले नाही.

सोशल मीडियावर कौतुक

वडिलांना वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणाऱ्या जोशनाची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे. अनेकांनी तिला या धाडसासाठी सन्मानित करण्याची मागणी केली आहे. जोशनाचे शिक्षण 8वीपर्यंत झाले. पण शेतापासून शाळा दूर असल्यामुळे तिने शिक्षण सोडले.

उदयपूरचे अनिल रॉजर्स (वन्यजीव संरक्षणकर्ते) व लक्ष्मण पारंगी यांच्या माहितीनुसार, अस्वल धोक्याच्या स्थितीत जास्त आक्रमक होतो. सावज सुटले तरी ते पुन्हा पकडते. एका व्यक्ती वाचणे अवघड असते. तो तोंडावर पहिल्यांदा हल्ला करतो. एकाच फटक्यात सावजाला अर्धमेला करतो. अस्वलाच्या डोळ्यावर फटका मारला तर तो मागे हटण्याची शक्यता असते.

अस्वलाच्या हल्ल्याची माहिती मिळताच गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांनी प्रशासनाकडे मदतीची याचना केली आहे.
अस्वलाच्या हल्ल्याची माहिती मिळताच गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांनी प्रशासनाकडे मदतीची याचना केली आहे.
बातम्या आणखी आहेत...