आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षीय मुलीने स्वतःच्या बलात्काऱ्याला केले ठार:माजी सरपंचाचा मुलगा दीड महिन्यांपासून करत होता रेप, राजस्थानातील घटना

अलवरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या अलवरमध्ये एका 14 वर्षीय बलात्कार पीडितेने आरोपी तरुणाची हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. रेप करणारा माजी सरपंचाचा मुलगा होता. त्याचा मृतदेह 18 मे रोजी अलवरच्या कोटकासीम भागात आढळला. पोलिसांनी आता त्याची हत्या झाल्याचा खुलासा केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, माजी सरपंचाचा मुलगा गत काही दिवसांपासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करुन बलात्कार करत होता. एवढेच नाही तर तो पीडितेवर आपल्या मित्रांशीही शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. ही गोष्ट मुलीला सहन झाली नाही. त्यामुळे तिने त्याला शेतात बोलावून ठार मारले. घटनेवेळी मृत तरुण दारुच्या नशेत होता.

गावातीलच होती तरुणी

भिवाडी एएसपी अतूल साहू यांनी सांगितले की, 17 मे रोजी रात्री माजी सरपंच धनीराम यादव यांचा मुलगा विक्रम यादव (45) याची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या दुसऱ्या दिवशी त्याचे पार्थीव गावच्या रस्त्यालगत आढळले. नातेवाईकांना हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे वाटले. त्यांनी मृतदेह घरी नेला.

पण, अंत्यसंस्कारावेळी विक्रमच्या गळ्यावर खुणा आढळल्या. रक्ताचे डागही आढळले. त्यामुळे कुटुंबियांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. तपासात गावातीलच इयत्ता 10 वीत शिकणारी तरुणी संशयाच्या भोवऱ्यात अडकली. मुलीला आई नाही. तिचा भाऊ खासगी नोकरी करतो. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.

अफेयरची गोष्ट झाली होती उघड

एएसपी साहू यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलगी विक्रम यादव याच्या घरी पाणी भरण्यासाठी जात होती. दीड महिन्यांपूर्वी तिने आपल्या मित्राला फोन करण्यासाठी विक्रमला फोन मागितला. त्यावर विक्रमने दोघांतील संभाषण रेकॉर्ड केले. त्यानंतर हे संभाषण सार्वजनिक करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बलात्कार केला.

विक्रम अल्पवयीन तरुणीवर आपल्या मित्रांनाही शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकत होता. यामुळे तरुणी संतप्त झाली होती.

दुसरीकडे, विक्रमपूर्वी गावातील अन्य 2 तरुणांनीही पीडितेवर बलात्कार केला होता. जवळपास 6 महिन्यांपूर्वी या तरुणांनाही तिच्या अफेयरची गोष्ट कळली होती. ते ही या मुद्यावरुन तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार करत होते.

शेतात बोलावले व खात्मा केला

एएसपींनी सांगितले की, 17 मे रोजी सायंकाळी तरुणी विक्रमच्या घरी आली. तिने पाणी भरण्याचा बहाणा केला होता. तिने विक्रमला इशारा करुन रात्री 9.30 वा. घरालगतच्या शेतात बोलावले. विक्रम दारुच्या नशेत तिथे पोहोचला. याचा फायदा घेऊन तिने त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह रस्त्याच्या शेजारी फेकून दिला.

कोटकासीम ठाण्याचे पोलिस अधिकारी महावीर सिंह शेखावत यांनी प्रकरण उजेडात आल्यानंतर अल्पवयीन तरुणीला अलवरच्या महिला सुधारगृहात पाठवण्यात आल्याचे सांगितले. पीडितेने विक्रम सिंहसह तिघांवर सोमवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांना घटनास्थळी पायांची चिन्हे आढळली. त्याचाही तपास केला जात आहे.
पोलिसांना घटनास्थळी पायांची चिन्हे आढळली. त्याचाही तपास केला जात आहे.
पोलिसांना घटनास्थळी विक्रमचा मोबाईलही आढळळा. त्याचा तपास केला असता त्यात अल्पवयीन तरुणीविरोधात पुरावे आढळले.
पोलिसांना घटनास्थळी विक्रमचा मोबाईलही आढळळा. त्याचा तपास केला असता त्यात अल्पवयीन तरुणीविरोधात पुरावे आढळले.
बातम्या आणखी आहेत...