आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरीवलीत 4 मजली इमारत कोसळली:8 कुटुंबे होती वास्तव्यास, सर्व सुखरूप; 30 ते 35 वर्षे जुनी होती इमारत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरीवलीमध्ये गीतांजली नावाची 4 मजली इमारत कोसळली आहे. इमारत कोसळण्याच्या काही तास आधी म्हणजे शुक्रवारी सकाळी इमारतीमधील रहिवाश्यांना बाहेर काढण्यात आले होते. या इमारतीमध्ये 12 ते 14 फ्लॅट होत अशी माहिती आहे.

अग्निशमन दल दाखल

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.घटनास्थळी 8 अग्निशमन दलाचे बंब, 2 रेस्क्यू व्हॅन, 1 QRV, 1 कमांड पोस्ट वाहन आणि 3 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत

इमारत जीर्ण
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळलेली इमारत अतिशय जीर्ण झाली होती. इमारतीच्या बाजुलाच नाला होता. इमारतीला लागूनच काही झाडे-झुडपे वाढल्यामुळे इमारतीच्या भींतीला तडे गेले होते.

इमारतीत आठ कुटुंबे वास्तव्यास

इमारतीत सात ते आठ कुटुंबे राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारी 12: 45 च्या सुमारास ही इमारत कोसळली असल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातामध्ये शेजारच्या फुटपाथावर राहणारे काही व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तर आमदार सुनिल राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित इमारत 30 ते 35 वर्ष जुनी होती. इमारत पडण्याचा अंदाज आल्याने आज सकाळीच रहिवाशांना बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...