आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A 6 year old Student Died After Being Beaten By A Teacher, Latest News And Update

शिक्षकाच्या मारहाणीत 6 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू:गृहपाठ न केल्याची शिक्षा, विद्यार्थी शाळेबाहेर बेशुद्ध आढळला; चेहऱ्यावर होती सूज

पाटणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

होमवर्क न केल्याच्या मुद्यावरून शिक्षकाने केलेल्या मारहाणीत एका 6 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. हे प्रकरण गयाचे आहे. 6 वर्षीय विद्यार्थी तिसऱ्या वर्गात शाळेच्याच वसतीगृहात राहून शिक्षण घेत होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी बुधवारी शाळेच्या गेटबाहेर बेशुद्धावस्थेत आढळला. त्याचा चेहरा सुजला होता. तसेच नाकातूनही रक्त येत होते. गणवेषही फाटला होता. रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला.

मृत विद्यार्थी वजीरगंज-फतेहपूर स्थित बडही बिगहा गावच्या लिटिल लीडर्स पब्लिक स्कूलमध्ये शिकत होता. त्याचे घर शाळेपासून 3 किमी दूर होते. त्यामुळे घरच्यांनी त्याला शाळेच्या बोर्डिंगमध्ये टाकले होते. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयानी शाळेबाहेर गदारोळ केला. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी संस्थाचालक विकास सिंह यांना अटक केली. त्यांच्यावर भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर शाळाही बंद करण्यात आली आहे. वसतीगृहातील सर्वच विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

गावकऱ्यांनी शाळेबाहेर निदर्शने केली.
गावकऱ्यांनी शाळेबाहेर निदर्शने केली.

शाळेत नेहमीच मारहाण

विद्यार्थ्याचे आजोबा रामबालक प्रसाद यांनी शाळेवर मारहाण व मुलाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले -'मुलाला यापूर्वीही शाळेत बेदम मारहाण करण्यात आली होती. पण शालेय प्रशासनाने यापुढे असे होणार नाही, असे सांगत प्रकरणावर पडदा टाकला. त्यानंतर सर्वकाही सुरूळीत झाले होते.'

आजोबा म्हणाले की, 'शाळेतील शिक्षक विकास कुमार सिंह यांनी माझा नातू विवेक कुमार याला मारहाण करून शाळेबाहेर काढले. त्यानंतर शाळेच्या बाहेर तो बेशुद्धावस्थेत आढळला.'

मुलाला चेहरा सुजेपर्यंत मारहाण करण्यात आली होती.

ते म्हणाले -'गावातीलच बंटी राजवंशी त्या मार्गाने जात होता. त्याने विवेकला बेशुद्धावस्थेत पाहिले. तो त्याला घरी घेऊन आला. आम्ही त्याला शाळेत घेऊन गेलो. त्यानंतर ठाण्यात गेलो. पण पोलिसांनी प्रथम विद्यार्थ्यावर उपचार करण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही त्याला घेऊन रुग्णालयात जात होतो, पण रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.'

मुलाचा चेहरा सुजलेला होता

वजीरगंज सीएचएसचे डॉक्टर रवीशंकर कुमार यांनी सांगितले की, विवेक रुग्णालयात आला होता तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. त्याच्या शरीराच्या वरच्या भागावर सूज होती. प्राथमिक उपचारानंतर आम्ही त्याला तत्काळ एएनएमसीएचला रेफर केले.

बातम्या आणखी आहेत...