आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
झारखंडमध्ये कोंबड्यांच्या पारंपरिक झुंजीच्या खेळाला आता हायप्रोफाइल जुगाराचे स्वरूप मिळाले आहे. शहर व आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगार मोठ्या प्रमाणात जुगार लावत आहेत. येथे एकाच वेळी शेकडो लोक बोली लावतात. हा खेळ मोठ्या मैदानात खेळला जात आहे. विधानसभेपासून अवघ्या ५०० मीटरवर हा गुन्हा घडत असताना पोलिस याकडे डोळेझाक करत आहेत. या कोंबड्यांवर १० लाखांपर्यंतची बोली लावली जाते. अनेक ठिकाणी तर ५०० रुपयांपासून बोली सुरू होते. धक्कादायक म्हणजे, रेकॉर्डिंगचा किंवा फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यास जीव जाण्याचाही धोका असतो.
कुठे घडतेय : नामकूममधील भुसूर ओपीपासून केवळ ५०० मीटरवरील टोनको, ओरमांझी, अनगडा, कांके, तमाड बाजारात रंगतो जुगाराचा खेळ.
कसा चालतो खेळ : कोंबड्यांच्या झुंजीत सट्टेबाजी होते. हब्बा-डब्बा, लुडो तसेच बेकायदेशीररीत्या दारूचीही विक्री केली जाते.
३० सेकंदांचा रक्तरंजित खेळ : कोंबड्यांच्या पायात चाकू बांधलेला असतो. ३० सेकंदांच्या आत एकाच्या मृत्यूने खेळ थांबतो.
मोठा प्रश्न : महागड्या गाड्यांमध्ये गुन्हेगारांचे जथ्थे येथे गोळा होतात. यानंतरही पोलिसांचे याकडे दुर्लक्ष का?
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.