आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-ऑस्ट्रेलिया आज दुसरा वनडे:यजमान भारतीय संघाला मालिका विजयाची संधी; कर्णधार रोहित शर्माही पुनरागमन करणार

विशाखापट्टणम8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या विजयाने फाॅर्मात आलेला यजमान भारतीय संघ आता घरच्या मैदानावर पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची सलग दुसरी मालिका आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताला घरच्या मैदानावर मालिका विजयाची संधी आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी मालिकेतील दुसरा वनडे सामना हाेणार आहे. विशाखापट्टणम येथे हे दाेन्ही संघ दुपारी १.३० वाजेपासून समाेरासमाेर असतील. भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर विजयी सलामी देत शुक्रवारी तीन वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने आघाडी घेतली.

आता विशाखापट्टणम येथील मैदानावर सामना जिंकल्यासह भारताला मालिकेत विजयी आघाडी घेता येईल. आता टीमचा नियमित कर्णधार राेहित शर्माही पुनरागमन करणार आहे

बातम्या आणखी आहेत...