आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याची सुटका:90 फूट खोल अडकलेल्या मुलाला तंत्राने नाही, तर युक्तीने काढले

जालोर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माधारामने अातापर्यंत चार जणांना वाचवले

राजस्थानच्या जालाेरमधील सांचाैर शहरापासून ३ किमी अंतरावर लाछडी सीमेजवळ बाेअरवेलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या अनिलला तब्बल १८ तासांनंतर मध्यरात्री २.३० वाजता सुरक्षित बाहेर काढण्यात यश अाले. अनिलला बाहेर काढण्यासाठी गुजरातमधील बडाेदा अाणि अजमेर येथून एनडीअारएफचे पथकही दाखल झाले हाेते. परंतु त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर देशी क्लृप्त्या लढवणारे भिनमाल गावातील तज्ज्ञ माधाराम सुथार यांना पाचारण करण्यात अाले. त्यांनी केवळ २५ मिनिटांतच मुलाला बाहेर काढले.लाछडी येथील नागाराम अापल्या घरापासून १०० फूट अंतरावर बाेअरवेल खाेदत हाेते. काम बंद असल्याने त्यांनी खड्डा झाकून ठेवला हाेता. परंतु सकाळी खेळता खेळता मुलगा बाेअरवेलजवळ पाेहोचला अाणि त्यात पडला. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पाेहोचले. तब्बल १८ तासांनंतर मुलाला बाहेर काढण्यात यश अाले.

माधारामने अातापर्यंत चार जणांना वाचवले
६० वर्षांचे माधाराम सुथार देशी क्लृप्त्या लढवण्यात हुशार मानले जातात. याअाधीही त्यांनी तीन मुलांना बाहेर काढले अाहे. २०१६ मध्ये काेरी गावात दीड वर्षाची मुलगी ३६० फूट खाेल बाेअरवेलमध्ये पडली हाेती. तीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी माधारामनेच काढला. माधारामच्या चमूमध्ये त्याच्या दाेन मुलांसह ५ जण अाहेत.

२५ मिनिटांत खटपट
माधाराम यांनी ९० फूट बाेअरवेलमध्ये टाकण्यासाठी १०० फूट लांबीचे तीन प्लास्टिकचे पाइप घेतले. ९ इंच गाेलाकार असलेल्या बाेअरवेलमध्ये बराेबर त्याच मापाचे तीन पाइप ठेवून त्याच्या अंतिम टाेकावर दाेरीने इंग्रजी ‘टी’ करून ताे पाइपमध्ये टाकला. त्यानंतर तिन्ही पाइप एकत्र बाेअरवेलमध्ये साेडले. हे तिन्ही पाइप शेवटच्या टाेकापर्यंत गेले. पाइप मुलाच्या अंगावरून (ज्या ठिकाणी ताे अडकला हाेता) खाली गेले. नंतर ‘टी’ जवळ अाणून दाेरी खेचली असता हा मुलगा पाइपच्या मधाेमध अाला अाणि त्याला वरती खेचले.

बातम्या आणखी आहेत...