आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूर्यग्रहण:राजस्थान, हरियाणात दिसेल कंकणाकृती सूर्यग्रहण, रविवारी 21 जून, सकाळी 9.16 वाजता स्पर्श

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रहणात चंद्र सूर्याला सुमारे 98.06% झाकून टाकेल.

या वर्षातील सर्वात मोठी खगोलीय घटना २१ जून, रविवारी घडणार आहे. या दिवशी सूर्यग्रहण दिसेल. ते देशातील अनेक भागांत दिसणार आहे. महाराष्ट्रात नागपूरमध्ये हे सूर्यग्रहण ६३.७ टक्के दिसणार आहे. भूगर्भशास्त्र मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, ग्रहण सकाळी ९.१६ मिनिटांनी सुरू होईल.

कंकणाकृती अवस्था सकाळी १०.१९ वाजता सुरू होईल. ते दुपारी २.०२ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर काही प्रमाणातील अवस्था दुपारी ३.०४ वाजता संपेल. देशाच्या उत्तरेकडील राज्यांत म्हणजे, राजस्थान, हरियाणा व उत्तराखंडात कंकणाकृती ग्रहण पाहता येणार आहे. देशातील उर्वरित भागात हे ग्रहण काही प्रमाणात दिसेल. सूर्यग्रहण अमावास्येच्या दिवशी पृथ्वी व सूर्याच्या मध्ये चंद्र प्रवेश करतो तेव्हा घडते. हे तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत येतात. मात्र, सूर्यग्रहण काही वेळासाठीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये.

कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणारी ठिकाणे

  • डेहराडून
  • कुरुक्षेत्र
  • चमोली
  • जोशीमठ
  • सिरसा
  • सूरतगड इत्यादी.

ग्रहणात चंद्र सूर्याला सुमारे ९८.०६% झाकून टाकेल.

बातम्या आणखी आहेत...