आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A Company With 300 Employees Does Not Need Government Approval If It Wants To Be Fired, Parliament Passes A Bill To Improve Employment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:नोकरीवरून काढायचे असल्यास 300 कर्मचारी असणाऱ्या कंपनीला सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही, संसदेत रोजगार सुधारणेशी संबंधित एक विधेयक पास

बिभुदत्त प्रधान | नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या विधेयकामुळे गुंतवणूक आणण्यास मदत व कंपन्यांनाही व्यवसाय करताना याचा फायदा होईल असा अंदाज

संसदेत रोजगार सुधारणेशी संबंधित एक विधेयक पास करण्यात आले आहे. त्यानुसार नोकर कपात करण्यासाठी आता ३०० कर्मचारी असणाऱ्या कंपनीला सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असणार नाही.

या विधेयकामुळे गुंतवणूक आणण्यास मदत होईल व कंपन्यांनाही व्यवसाय करताना याचा फायदा होईल अंदाज व्यक्त होत आहे. नवीन विधेयकांत इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोडप्रमाणे तरतूद केली आहे. त्यानुसार ३०० कर्मचारी ज्या कंपनीत काम करतात तेथील नोकर कपात करताना सरकारची मंजुरी घेण्याची आवश्यता नाही. पूर्वी १०० कर्मचारी असलेलया कंपन्यांसाठी हा नियम होता. संसदेत सामाजिक सुरक्षा व सुरक्षेशी संबंधित इतर दोन विधेयक पास झाले. राज्यसभेत हे विधेयक बुधवारी मंजूर झाले. लोकसभेत एक दिवस आधीच याला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. विधेयकावरील चर्चे दरम्यान कामगार व रोजगार मंत्री संतोष गंगवार म्हणाले की, विधेयकाच्या माध्यमातून कामगारांचे कल्याण व ईझ ऑफ डुइंग बिझनेस या दोन्हीचे संतुलन राखले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...