आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविशाखापट्टनममध्ये हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडच्या कँपसमध्ये क्रेन कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. डीसीपी सुरेश बाबूंनी सांगितले की, या अपघातात एक व्यक्तीही जखमी झालेला आहे. पोलिस कमिश्नर राजीव कुमार मीणा यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी 12 वाजता झाला. एका ट्रेड यूनियन लीडरने सांगितले की, क्रेन ओव्हरलोड होती. कदाचित याच कारणामुळे हा अपघात झाला.
पोलिसांनी सांगितल्यानुसार क्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. जेव्हा अधिकारी आणि क्रेनचे ऑपरेटर्स क्रेनची तपासणी करत असताना हा अपघात झाला. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण क्रेनखाली काही लोक अडकले असल्याची शक्यता आहे.
एचएसएल देशातील सर्वात जुने शिपयार्ड आहे. याची स्थापना 1941 मध्ये सिंधिया स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनीच्या माध्यमातून उद्योजक वालचंद हीराचंद यांनी केली होती. 191 मध्ये शिपयार्डचे राष्ट्रीयकरण झाले. तेव्हापासून याचे नाव हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड आहे. 2010 पासून याचे स्वामित्त्व संरक्षण मंत्रालयाकडे आहे. यापूर्वी शिपिंग मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.