आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमधील अमृतसर मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या गुरु नानक देव हॉस्पिटलमध्ये (GNDH) शनिवारी दुपारी अचानक आग लागली. एक्स-रे युनिटच्या मागील बाजूस ठेवलेल्या दोन ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटानंतर आग भडकली. आगीमुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात धुर पसरले होते. रुग्णालयातील वॉर्डांमध्ये दाखल असलेल्या 650 रुग्णांना बाहेर काढून रस्त्यावर नेण्यात आले आहे.
गुरुनानक देव रुग्णालयात दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. शनिवार असल्याने ओपीडीमध्ये एकही रुग्ण नव्हता, मात्र रुग्णालयातील वॉर्डांमध्ये सुमारे 650 रुग्ण दाखल होते. ओपीडीच्या मागील बाजूस आणि एक्स-रे युनिटजवळ दोन ट्रान्सफॉर्मर आहेत. ते संपूर्ण हॉस्पिटलला वीज पुरवठा करतात. दुपारी या ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट होऊन आग भडकली. ट्रान्सफॉर्मरच्या वरतीच स्किन वॉर्ड आहे. धूर इतका होता की वॉर्डातील रुग्णांना तातडीने बाहेर काढावे लागले.
धुरामुळे रुग्ण रस्त्यावर
ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले. रुग्णांचा श्वास कोंडायला लागला. यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयातून रस्त्यावर आणण्यात आले. चेंगराचेंगरीमुळे अनेक रुग्णांना खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले.
आग विझवण्यासाठी शर्थीतीचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. गेल्या एक तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ट्रान्सफॉर्मरमधील तेलामुळे आग आटोक्यात आणणे कठीण होत आहे.
अग्निसुरक्षा नियमांमुळे आग आटोक्यात
रुग्णालयाच्या अग्निसुरक्षा यंत्रणेमुळे आग आटोक्यात आणण्यात येत असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले. फायर सेफ्टी इन्स्पेक्टरने लगेच आगीचे गोळे ट्रान्सफॉर्मरच्या दिशेने फेकले. सध्या रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे, मात्र इमारतीतील धूर कमी होऊ लागताच रुग्णांना पुन्हा वॉर्डात हलवण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.