आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण आग:दिल्लीतील गोकुळपुरी येथील झोपडपट्ट्यांना रात्री उशिरा भीषण आग; सात जणांचा मृत्यू, 60 झोपडपट्ट्याही जळून राख

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानी दिल्लीच्या उत्तर-पूर्व भागातील गोकुळपुरी येथील झोपडपट्ट्यांना रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. झोपडपट्टीला आग लागताच सर्वत्र गोंधळ उडाला. झोपडपट्ट्या जळत असताना आजूबाजूला धुराचे लोट पसरले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक तास प्रयत्न केले. सध्या कूलिंगचे काम सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार या भीषण आगीत सुमारे 60 झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागाला मध्यरात्री या भागात आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ही घटना गोकुळपुरीच्या 12 क्रमांकाच्या खांबाच्या आसपास सांगितली जात आहे.दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून, मी स्वतः घटनास्थळी जाऊन पीडितांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

जळालेले मृतदेह ओळखणे कठीण
दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, 7 जळालेले मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटवणे फार कठीण आहे. ते म्हणाले की, आगीमुळे जे लोक मरण पावले, हे लोक झोपलेले दिसत होते आणि आग खूप वेगाने पसरली असल्याने त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...